इंग्लंड क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन वयाच्या ३८ व्या वर्षीही फनी गोलंदाजी करत आहे. सध्या तो इंग्लंडकडून टी२० किंवा वनडे क्रिकेट खेळत नसला तरी, कसोटी संघाचा प्रमुख सदस्य आहे. चेन्नई येथे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने पाच बळी आपल्या नावे केले. यादरम्यान त्याने दोन भारतीय फलंदाजांना शून्यावर बाद केले. यासह, त्याने एका खास कामगिरीची नोंद आपल्या नावे केली.
दिग्गजांत सामील आहे अँडरसन
जेम्स अँडरसन जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांमध्ये समाविष्ट होतो. त्याने आत्तापर्यंत इंग्लंडसाठी १५८ कसोटीत ६११ बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये त्याचा चौथा क्रमांक लागतो. तसेच, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. कसोटी क्रिकेटव्यतिरीक्त अँडरसनने आत्तापर्यंत १९४ वनडे सामन्यात २६९ बळी घेतले आहेत. तसेच, १९ टी२० सामन्यात १८ बळी त्याच्या नावे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९००पेक्षा जास्त बळींना वावर असणाऱ्या काही मोजक्या गोलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे.
‘डक स्पेशालिस्ट’ अँडरसन
अनेक विक्रम नावे असलेला अँडरसन फलंदाजांना खातेही न खोलू देण्यात माहिर आहे. विशेष म्हणजे त्याने सर्वाधिक वेळा भारतीय फलंदाजांना शून्यावर बाद केले आहे. अँडरसनने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत २९ भारतीय फलंदाजांना खाते खोलू दिले नाही. त्यापाठोपाठ, पाकिस्तान संघाच्या २५ फलंदाजांना त्याने शून्यावर तंबूत धाडले आहे. भारत आणि पाकिस्ताननंतर दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीजच्या प्रत्येकी २१ फलंदाजांना शून्याच्या पुढे जाऊ दिले नाही. अँडरसनने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत तब्बल १४७ फलंदाजांना शून्यावर बाद करण्याची अफलातून कामगिरी केली आहे.
अँडरसनने शून्यावर बाद केलेले फलंदाज (देशनिहाय)-
भारत- २९
पाकिस्तान- २५
दक्षिण आफ्रिका- २१
वेस्ट इंडीज- २१
ऑस्ट्रेलिया- १६
न्युझीलँड- १३
श्रीलंका- १३
झिम्बाब्वे- ३
बांगलादेश- २
आयर्लंड- २
नेदरलँड- १
स्कॉटलँड- १
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता