पाहुण्या इंग्लंडने ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतावर विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने कसोटीतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. तसेच या मालिकेतही १-० ने आघाडी घेतली. इंग्लंडने शेवटच्या डावात इंडियाला विजयासाठी ४२० धावांचे तगडे आव्हान दिले होते. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघ १९२ धावांवरच गारद झाला. इंग्लंडच्या या विजयात जेम्स अंडरसन याने महत्त्वपुर्ण भूमिका निभावली.
महत्त्वाचे म्हणजे, अंडरसन हा भारताला पराभूत करणाऱ्या इंग्लंड संघातील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. सध्या त्याचे वय ३८ वर्षे १९४ दिवस इतके आहे. यासह भारताच्या मैदानावर भारतीय संघाला कसोटीत पराभूत करणारा तो सर्वात वयस्कर परदेशी खेळाडू ठरला आहे.
अंडरसनपुर्वी वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू सर क्लाइव्ह लॉयड यांनी हा किर्तीमान केला होता. १९८३ मध्ये कोलकाता येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी सामना झाला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला होता. यावेळी क्लाइव्ह लॉयड हे ३९ वर्षे १०५ वर्षांचे होते.
https://twitter.com/SampathStats/status/1359051844182372355?s=20
चेन्नई कसोटीतील जेम्स अंडरसनची कामगिरी
वेगवान गोलंदाज असलेल्या अंडरसनने भारताच्या दुसऱ्या डावात ३ आणि पहिल्या डावात २ अशा एकूण ५ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातील २७ व्या षटकात त्याने शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेची दांडी उडवली. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतलाही अवघ्या ११ धावांवर माघारी धाडले. तत्पुर्वी पहिल्या डावात इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना त्याने पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-विराटसारखे दिग्गज संघात असूनही टीम इंडिया का झाली पराभूत? जाणून घ्या पाच ठळक कारणं
इंग्लंड नडतेच, आजवर ‘इतक्यांदा’ केलंय टीम इंडियाला मायभूमीत चितपट






