3 जानेवारी ते 6 जानेवारी या दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात सिडनी येथे 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. यामध्ये शनिवारी (4 जानेवारी) तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेम्स पॅटिन्सन विचित्र पद्धतीने बाद झाला.
पॅटिन्सनला निल वॅगनरने बाद केले. परंतु, हा क्षण इतका आश्चर्यकारक होता की त्याचा व्हिडिओ Cricket.com.au. ने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
You've got to be kidding! James Pattinson can't believe his luck! 😦@bet365_aus | #AUSvNZ pic.twitter.com/hSJIeCWdd9
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2020
झाले असे की, वॅगनरचा चेंडू खेळण्यासाठी पॅटिन्सन थोडा पुढे वाकला. परंतु चेंडू त्याच्या खांद्याला आणि ग्लव्हजला लागला. त्यानंतर चेंडू बॅटच्या मागील टोकाला लागून थेट स्टंप्सवर जाऊन लागला. त्यामुळे तो बाद झाला. यावेळी त्याने फक्त दोनच धावा केल्या. त्याला असे विचित्र पद्धतीने बाद झालेले पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
पॅटिन्सन यापूर्वी मार्च 2019मध्ये ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत क्रिकेटमधील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेमध्येही अशाच विचित्र प्रकारे बाद झाला होता.
श्रीलंका विरुद्ध कितीही धावा केल्या तरी शिखरपेक्षा हा खेळाडूच भारी!
वाचा- 👉https://t.co/wcDhwmTUbn👈#म #मराठी #Cricket @SDhawan25
— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020
विराटच्या चाहत्याने दिलेली ही भेट पाहून तुम्हीही थक्क व्हाल…
वाचा- 👉https://t.co/2iZVoYwDh5👈#म #मराठी #Cricket @imVkohli— Maha Sports (@Maha_Sports) January 6, 2020