Janith Liyanage Wicket :- भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान श्रीलंकेच्या एका फलंदाजाने बाद न नसतानाही मैदान सोडले आणि त्याला विनाकारण आपली विकेट गमवावी लागली. नेमके काय घडले?, जाणून घेऊया..
श्रीलंकेच्या डावाच्या 35व्या षटकात एक घटना घडली, जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. त्या षटकात श्रीलंकेचा फलंदाज जानिथ लियानागेने भारतीय संघाला त्याची विकेट भेट दिली. तो नाबाद होता, पण पंचांनी त्याला बाद देण्यापूर्वी तो स्वत: क्रीज सोडून पॅव्हेलियनकडे निघून गेला.
त्याचे झाले असे की, अक्षर पटेल 35व्या षटकात गोलंदाजी करायला आला. त्याचा दुसरा चेंडू श्रीलंकेचा फलंदाज जेनिथ लियानागेच्या बॅटच्या अगदी जवळ गेला आणि स्लिपमध्ये उभा असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माने तो चेंडू टिपला. यानंतर रोहित आणि संघाने अपील केले, पण पंचांनी बाद दिले नाही.
WICKET🚨 Janith Liyanage 20(26) ct Rohit Sharma b Axar Patel, Sri Lanka 142/6🇱🇰
India vs Srilanka 1st odi match 2024 🇮🇳🇱🇰#indvssl #1stodi #axarpatel #rohithsharma #out #wicket #slvsind #viral #odiseries #teamindia #srilankacricket #3dkaran #cricketupdate #icc #bcci #cricketnew pic.twitter.com/3ymBxv9uqt
— 3𝐃 𝐊𝐀𝐑𝐀𝐍 (@KaranKu04154368) August 2, 2024
मात्र, भारतीय कर्णधाराने डीआरएस घेण्याचा विचार सुरू करताच जेनिथ लियानागे पॅव्हेलियनच्या दिशेने निघाला. त्यानंतर पंचांनीही बोट वर करत बादचा निर्णय दिला. नंतर टीव्ही रिप्लेमध्ये जेनिथ लियानागे नाबाद असल्याचे दिसून आले. त्याच्या बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झालेला नव्हता. ही घटना पाहिल्यानंतर संपूर्ण श्रीलंका संघाची निराशा झाली. हे पाहून श्रीलंकेचा प्रशिक्षक सनाथ जयसूर्याही भडकला. या संपूर्ण घटनेची सध्या सोशल मीडियावर चर्चा होतेय.
Ohh!! Shocker!! Janith Liyanage quits even before umpire rules out, so umpire has to raise the finger! Pathetic!!! #SLvIND pic.twitter.com/86sl6MEfJI
— Dulith Kasun (@DulithK) August 2, 2024
दरम्यान श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले. श्रीलंकेकडून सलामीवीर पथुम निसांकाने अर्धशतक ठोकले. 9 चौकारांसह त्याने 56 धावांची संथ खेळी केली. तसेच खालच्या फळीत दुनिथ वेल्लालगे याने नाबाद 67 धावांचे योगदान दिले. या खेळीदरम्यान त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले.
महत्त्वाच्या बातम्या-
“अरे माझ्याकडे काय बघतोय?”, श्रीलंकन फलंदाजाच्या विकेटवरुन गोंधळलेल्या रोहितची मजेशीर प्रतिक्रिया
आयपीएलवाला रूल है क्या! भारतीय खेळाडूंचा मजेशीर संवाद स्टंप माईकमध्ये कैद, व्हिडिओ व्हायरल