---Advertisement---

विंडीजविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती घेत बुमराह पत्नीसंगे घालवतोय सुट्ट्या, नावेतील फोटो होतायत व्हायरल

On: गुरूवार, जानेवारी 27, 2022 11:36 PM
Sanjana-And-Bumrah
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) सध्या विश्रांतीवर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती दिली गेली आहे. अशात बुमराह त्याला मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहे. बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन (Sanjana ganeshan) सध्या सुट्टांचा आनंद घेत आहेत. या दोघांचे समुद्राच्या मधोमध नावेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यात चांगले प्रदर्शन केल्यानंतर आणि भारतीय संघाचे आगामी काळातील व्यस्त वेळापत्रक पाहता बुमराहला विश्रांती देणे गरजेचे होते. अशात बुमराहने त्याच्या पत्नीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. बुमराह या फोटोंमध्ये एकदम साध्या लूकमध्ये दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळी जीन्स घातलेली पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CZOa-DHl4cm/?utm_source=ig_web_copy_link

बुमराहप्रमाणेच त्याची पत्नी संजानानेही सोशल मीडियावर दोघांचे फोटो पोस्ट केले आहेत. संजनाच्या पोस्टमध्ये एकून चार फोटो आहेत, त्यापैकी एका फोटोत बुमराह आणि संजना दोघे एकत्र दिसत आहेत. संजनाने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नावेत मी काहीशी अशाप्रकारे दिसते.’ चाहत्यांना या दोघांचे फोटो खूपच आवडले आहेत आणि पोस्टवर लाइक्सचा पाऊस पडत आहे.

https://www.instagram.com/p/CZOdK9XPFeD/?utm_source=ig_web_copy_link

मागच्या वर्षी मार्च महिन्यात बुमराह आणि संजना विवाहबद्ध झाले. बुमराह भारताचा एक उत्कृष्ट गोलंदाज असला, तरी संजनाही तिच्या क्षेत्रात मागे नाहीय. संजना एक चांगली टीव्ही ऍंकर आहे. मागच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या दोघांचा विवाह खूपच  कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी काही मोजकेच २० ते २५ लोक उपस्थित होते.

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतील बुमराहचे प्रदर्शन पाहता, ते समाधानकारक होते. अफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहने १२ विकेट्स घेतल्या. तसेच तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याने ५ विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

मेगा लिलावात ‘या’ ४ यष्टीरक्षकांची होणार चांदी! आयपीएल फ्रँचायझी पाण्यासारखा ओततील पैसा

पुष्पा फिव्हर! ‘श्रीवल्ली हुक स्टेप’ करत शाकिबने केले विकेटचे सेलिब्रेशन, व्हिडिओ बघतच राहाल

‘कोणीही टीम इंडियाचं नेतृत्त्व करण्यास नाही तयार, पण मी मात्र…’; शमीला नक्की म्हणायचंय तरी काय?

व्हिडिओ पाहा –

आणि विराट कोहलीला धरावे लागले सचिनचे पाय । Virat Touched Sachin's Feet

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---