---Advertisement---

आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपाठोपाठ बांगलादेशविरुद्ध हा खेळाडू नसणार टीम इंडियाचा भाग

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2019 7:04 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाठीच्या फ्रॅक्चरमुळे दक्षिण आफ्रिकाबरोबर झालेल्या मालिकेत खेळता आले नाही. यानंतर आता नोव्हेंबरमध्ये  होणाऱ्या बांग्लादेशविरुद्ध टी20 आणि कसोटी सामन्यातही तो खेळताना दिसणार नाही.

आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली . यात कसोटी तसेच टी२० मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला नाही. यामुळे यावर्षी भारताच्या या युवा प्रतिभावान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पहाता येणार नाही.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी सामन्यात बुमराहचा बदली खेळाडू म्हणून उमेश यादवला स्थान देण्यात आले होते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) बुमराहने लवकरात लवकर बरे व्हावे आणि विश्रांतीनंतर संघात पुनरागमन करावे अशी अपेक्षा आहे.

बीसीसीआयला बुमराहच्या बाबतीत कोणतीही घाई नाही, कारण पुढील वर्षी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी20 विश्वचषक होणार आहे.

बुमराहने पुर्णपणे बरा झाल्यानंतर संघात पुनरागमन करावे अशी अपेक्षा बीसीसीआयला आहे.

“स्ट्रेस फ्रॅक्चर बरे होणे खूप कठीण असते. याची त्याला वेळीच माहिती मिळाली होती आणि यामध्ये गंभीर असं काही नसल्याचे समजले होते. बुमराह जेव्हा पुनरागमन करेल तेव्हा तो फिट असावा अशी अपेक्षा आहे.”  असे बीसीसीआयमधील सुत्रांचे म्हणणे आहे.

“बुमराहला पुर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे त्याला बांग्लादेश विरुद्ध मालिकेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. बुमराहच्या गैरहजरीत भारतीय संघाची वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ईशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि उमेश यादव  यांच्यावर असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---