---Advertisement---

भारीच ना!! टप्पा पडताच बुमराहच्या चेंडूने बदलला काटा; काही कळायच्या आत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बाद

On: बुधवार, जानेवारी 12, 2022 11:00 AM
Jasprit Bumrah
---Advertisement---

केपटाऊनच्या (Cape town) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे (Sa vs Ind 3rd test). ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाला पहिल्या डावात २२३ धावा करण्यात यश आले. दरम्यान, गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह याने असा काही चेंडू टाकला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालतोय.

भारतीय संघाचा पहिला डाव २२३ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर डीन एल्गर आणि एडेन मार्करम गोलंदाजी करण्यासाठी खेळपट्टीवर आले होते. परंतु, या दोघांना ही चांगली सुरुवात करून देता आली नाही. डीन एल्गर (Dean Elgar) अवघ्या ३ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला.

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी सुरू असताना ५ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) डीन एल्गरला मिडल लेगला चेंडू टाकला. ज्यावर डीन एल्गरने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू टप्पा पडताच बाहेरच्या दिशेला गेला. ज्याचा एल्गरला अंदाज आला नाही. ज्यामुळे चेंडू बॅटची कडा घेत पहिल्या स्लीपमध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराच्या हातात गेला. स्वस्तात बाद होऊन माघारी परतल्यानंतर डीन एल्गर भलताच निराश झाला होता.

डीन एल्गरची रिॲक्शन पाहून असे वाटते की, डीन एल्गरकडे या चेंडूचे कुठलेही उत्तर नव्हते. अवघ्या १० धावांवर पहिला गडी बाद झाल्यानंतर भारतीय खेळाडू देखील भलतेच खुश झाले होते. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने ४३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाने पहिल्या डावात दिलेल्या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाला १ बाद १७ धावा करण्यात यश आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

पाकिस्तान दौऱ्यावर एकटे नाही जाणार ऑस्ट्रेलियन खेळाडू, जाणून घ्या कोण असेल सोबत

भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला-वहिला आंतरराष्ट्रीय सामना पाहिलाय का? बघा हा व्हिडिओ

हे नक्की पाहा :

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---