भारतीय क्रिकेट संघ सध्या टी-२० विश्वचषकासाठी यूएईमध्ये आहे. भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या युजवेंद्र चहलला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले नाही. टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्यी बाबतीत चहलनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जसप्रीत बुमराहला मात्र, टी२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. बुमराहकडे विश्वचषकात त्याच्या नावावर एका नवीन विक्रमाची नोंद करण्याची संधी आहे.
बुमराह विश्वचषकात युजवेंद्र चहलला मागे टाकून टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनू शकतो.
मागच्या काही काळात बुमराह क्रिकेटच्या तिनही प्रकारांमध्ये भारतीय संघासाठी महत्वाचा गोलंदाज ठरला आहे. तो सध्या टी-२० विश्वचषकातही भारतीय संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे. बुमराह भारतीय संघासाठी टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्यापासून केवळ ५ विकेट्सच्या अंतरावर आहे.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकातील त्यांच्या अभियानाची सुरुवात २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. बुमराह या सामन्यात २० महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२० च्या जानेवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. याव्यतिरिक्त त्याने आयपीएल २०२१ मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. यावर्षी आयपीएलमध्ये त्याने १४ सामन्यांमध्ये २१ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतासाठी सध्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज युजवेंद्र चहलला विश्वचषकात संधी दिली गेली नाही, त्याने त्याच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये आतापर्यंत ६४ विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ५९ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी चाहत्यांमध्ये रंगला ‘मीम्स वॉर’; ‘मौका-मौका’ सोशल मीडियावर ट्रेंड
बीसीसीआयवर होणार कुबेरकृपा! दोन नव्या फ्रॅंचाईजींकडून मिळू शकतात ‘इतके’ हजार कोटी