---Advertisement---

बुमराहच्या फिटनेसविषयी चांगली बातमी; स्ट्रेस फ्रॅक्चर नाही, ‘ही’ साधी दुखापत झालीये

On: रविवार, ऑक्टोबर 2, 2022 1:42 PM
Jasprit Bumrah
---Advertisement---

भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुखापत झाल्यामुळे संघाच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार बुमराहला ‘स्ट्रेस फ्रॅक्टर’ झाल्यामुळे तो आगामी टी-20 विश्वचषकात देखील खेळू शकणार नाहीये. दक्षिण आप्रिकेविरुद्धची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याने या मालिकेतून माघार घेतली होती. पण आता त्याच्या फिटनेसविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे. 

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत बुमराहने मैदानात पुनरागमन केले. या मालिकेतील शेवटचे दोन सामने त्याने खेळले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत देखील त्याला निवडले गेले होते, पण सराव सत्रात त्याला दुखापत झाल्याचे समोर आले आणि त्याने मालिकेतून माघार देखील घेतली. आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे. अशा बातम्या समोर आल्या की, बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकात देखील खेळणार नाहीये. परंतु बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बुमराह विश्वचषकात खेळण्याची आशा अजूनही कायम आहे.

माहितीनुसार बुमराहाला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ नाही, तर ‘स्ट्रेस रिएक्शन’ झाले आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी सांगितल्या गेलेल्या वेळेपेक्षा कमी काळ लागणार आहे. ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाले असेल तर त्यातून सावरण्यासाठी कोणत्याही खेळाडूला 4 ते 6 महिन्यांचा वेळ लागू शकतो. पण ‘स्ट्रेस रिएक्शन’मधून सावरण्यासाठी खेळाडूला 4 ते 6 आठवडे पुरेसे असतात. यायाच अर्थ असा होतो की, टी-20 विश्वचषकाच्या नॉक आउट सामन्यांसाठी बुमराह उपस्थित राहण्याची आशा अजूनही कायम आहे.

“राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) बीसीसीआयच्या मेडिकल टीमने केलेल्या स्कॅनवरून समजले की, हे ‘स्ट्रस फ्रॅक्चर’ नाही, तर ‘स्ट्रेस रिएक्शन’ आहे. ही दुखापत स्ट्रेस फ्रॅक्चरपेक्षा छोटी असते. ‘स्ट्रेस फ्रँक्चर’ ठीक होण्यासाठी 4 ते 6 महिने लागतात. तिथेच दुसरीकडे ‘स्ट्रेस रिएक्शन’मधून सावरण्यासाठी 4 ते 6 आठवडे लागतात,” अशी माहिती बीसीसीआच्या या वरिष्ठ सूत्रांकडून दिली गेली आहे.

आगामी टी-20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघ 5 ऑक्टोबर रोजी मुंबईहून पर्थसाठी रवाना होईल. बुमराह संघासोबत पर्थला जाईल, याची खूपच कमी शक्यता आहे. तरी संघ त्याची फिटनेस पाहून 15 ऑक्टोबरपर्यंत त्यांचा अंतिम निर्णय घेईल, असे सांगितले जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता
दुसऱ्या टी-20त भारताकडे इतिहास रचण्याची संधी; कधी जमला नाही, तो पराक्रम करणार रोहित आणि कंपनी    

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---