सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा धुव्वा उडवल्यानंतर भारतीय संघाने टी२० मालिकेत जोरदार पुनरागमन केले. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने इंग्लंडला धुळ चारत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या रचली मात्र, दोन्ही सामन्यात विजयाचे शिल्पकार प्रामुख्याने भारतीय गोलंदाजच ठरले. शनिवार ९जुलै रोजी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक विश्वविक्रम रचला आहे.
दुसऱ्या टी२० सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी २० षटकात १७० धावा रचल्या. यावेळी भारतासाठी सर्वाधिक अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने ४६ धावा केल्या. त्यानंतर मात्र, १७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडसंघाला पहिल्याच षटकात जेसन रॉयच्या रुपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपला वचक बसवला. या दरम्यान, जसप्रीत बुमराहने एका षटकात एकही धाव न देता टी२० कारकिर्दीत सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम रचला.
बुमराहने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये आजवर ५८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकुण ९ शटके मेडन म्हणजेच एकही धाव न देता टाकले आहेत. अशी कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह जगातील एकमेव गोलंदाज ठरला आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकुण १७९४ मेडन ओव्हर टाकल्या आहेत. शिवाय एकदिवसीय कारकिर्दीत शॉन पोलॉकने सर्वाधिक ३१३ मेडन ओव्हर टाकल्या आहेत.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताने विजय मिळवला आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी १० जुलै रोजी खेळवला जाणार आहे. यावेळी इंग्लंडसंघाला आपली प्रतिष्ठा वाचवण्याचे आवाहन असेल भारतीय संघ मात्र, इंग्लंडला व्हाईट वॉश देत रोहित शर्मा सलग सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर रिकी पाँटींगची बरोबरी करण्याच्या तयारित असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सचिन म्हणतो; त्यांना वयाच्या १३व्या वर्षी पाहिले, तेव्हा विश्वास बसत नव्हता!
बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरेलल्या विराटने क्षेत्ररक्षण करताना लुटली मैफील, पाहा भन्नाट व्हिडिओ
दुसऱ्या टी२० सामन्यात सामनावीर ठरलेल्या भुवीने दिलीये थेट कपिल देवला टक्कर! जाणून घ्या विक्रम