---Advertisement---

‘त्या’ एका कारणामुळे बुमराहला लोकं रोज देतात सल्ला, पण तो काही कुणाच ऐकत नाही

On: बुधवार, जून 3, 2020 7:41 AM
---Advertisement---

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. मागील काही वर्षांपासून बुमराहने आपल्या शानदार यॉर्कर गोलंदाजीने विरोधी संघाला अडचणीत आणले आहे. त्याच्या गोलंदाजीची पद्धतही वेगळी आहे. त्याचा त्याला फायदाही मिळत आहे.

काही महान खेळाडूंचं म्हणणं आहे, की ही पद्धत त्याच्या तंदुरुस्तीवर फरक पाडू शकते.
आयसीसीच्या पॉडकास्टमध्ये वेस्ट इंडीज संघाचा माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप (Ian Bishop) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलाक (Shaun Pollock) बरोबर तो सहभागी झाला होता. त्याने आपल्या आठवणीना उजाळा देत गोलंदाजीच्या मुद्द्यांवर विचार मांडले.

आताच्या काळात कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी व्हायचं असेल तर लहानपणा पासून खूप मेहनत करण्याची गरज आहे. पण या पॉडकास्ट दरम्यान त्याने सांगितलं, की मी यासाठी कोणत्याही प्रकारच प्रशिक्षण घेतलं नाही. जे काही शिकलो, ते स्वतः शिकलो.

आपल्या गोलंदाजी बद्दल बोलताना बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला, “मला कधीही प्रशिक्षण मिळालं नाही. मी कोणत्याही प्रशिक्षण केंद्र किंवा शिबिरात गेलो नाही. आजपर्यंत मी सर्व टी.व्ही. आणि व्हिडिओच्या माध्यमातून शिकलो आहे. माझ्या गोलंदाजी ऍक्शनचं अस वेगळं कारण नाही.”

त्याच्या गोलंदाजीची पद्धत बघून काही महान खेळाडू आणि माजी गोलंदाजांचे म्हणणं आहे, की त्याने गोलंदाजीची पद्धत बदलायला हवी. एवढंच नाही, तर काही लोकांचं म्हणणं आहे, की त्यामुळे त्याला स्ट्रेस फ्रॅक्चरचा सामना करावा लागला होता. त्यावर त्याने सांगितले, की तो गोलंदाजीवेळी छोटा रन अप का घेतो?

“मी कधीही अशा लोकांचं म्हणनं ऐकत नाही, ज्यांनी सांगितले होते, की मला गोलंदाजीची पद्धत बदलायला हवी. जर स्वत:वर आत्मविश्वास असेल, तेव्हा ताकद विकसित केली पाहिजे. मी माझ्या घरामागील मैदानात खेळत असायचो. तेथे जागा जास्त नसल्यामुळे माझे रन अप लहान असायचा. मला वाटतं हे कारण असेल. मी बऱ्याच काळापासून रन अप बदलण्याचा विचार केला नाही. माझी गती पण अजूनही तेवढीच आहे,” असे पुढे तो म्हणाला.

महत्वाचं म्हणजे मागील वर्षीच त्याच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे तो बराच काळ मैदानाबाहेर होता.

त्याने जानेवारीत श्रीलंकेविरूद्ध (Sri Lanka) झालेल्या टी२० मालिकेमधून पुनरागमन केले होते. त्यावेळी तो त्याच्या जुन्या अंदाजात दिसला नाही, ज्यासाठी तो ओळखला जातो. न्यूझीलंडमध्येही विकेटसाठी त्याला संघर्ष करावा लागला. भारतीय संघासाठी त्याचे फीट राहणे महत्वाचे आहे. तो फीट राहिला, तर तो त्याच्या लयीत येईल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-टी२० विश्वचषकाऐवजी आयपीएल खेळण्यास तयार आहे ‘हा’ राजस्थान रॉयल्सचा खेळाडू

-पाकिस्तानविरुद्ध वनडेत सर्वाधिक पराभव पाहणारे ५ भारतीय कर्णधार

-…म्हणून सौरव गांगुलीची इच्छा नव्हती की मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करावं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---