---Advertisement---

बाबो! बुमराहच्या पत्नीने सोडली पातळी; युजरला सडेतोड प्रत्युत्तर देत म्हणाली, ‘तुझं थोबाड चपलीसारखं…’

On: मंगळवार, नोव्हेंबर 8, 2022 5:57 PM
Sanjana-Ganesan
---Advertisement---

क्रिकेटपटू आणि नेटकरी यांचे घनिष्ठ नाते असते. जेव्हा एखादा क्रिकेटपटू चांगली कामगिरी करतो, तेव्हा नेटकरी त्याला डोक्यावर घेतात. मात्र, अनेकदा नेटकरी क्रिकेटपटूसह त्याच्या जवळच्या व्यक्तींनाही ट्रोल केल्याशिवाय राहत नाहीत. असेच काहीसे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन हिच्यासोबत घडले. सोशल मीडियावर संजनाला एका नेटकऱ्याने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण संजनाने त्याला जोरदार प्रत्युत्तर देत त्याची बोलती बंद केली.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) या स्पर्धेमधून बाहेर पडला होता. मात्र, बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही आयसीसीकडून या स्पर्धेत एँकरची भूमिका साकारत आहे. तिने या मोठ्या स्पर्धेसाठी अनेक दिग्गज खेळाडूंच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. सोबतच ती सामन्यानंतर माजी दिग्गज खेळाडूंसोबत विजय-पराभवाबद्दल चर्चा करते. मात्र, नुकतेच तिने सोशल मीडियावर एका नेटकऱ्याला जोरदार ट्रोल केले.

https://www.instagram.com/p/CksF28WvKZF/?utm_source=ig_embed&ig_rid=14741018-cb9f-4b94-852b-ac5947447171

जसप्रीत बुमराह याची पत्नी संजना गणेशन (Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “ऍडलेडमधील वातावरण सध्या खूपच सुंदर आहे.” तिच्या या पोस्टवर कमेंट करत एकाने युजरने लिहिले की, “मॅडम तुम्ही इतक्या सुंदर दिसत नाहीत, पण बुमराहला कसं पटवलं?”

Sanjana-Ganesan-Insta
Photo Courtesy: Instagram/sanjanaganesan

संजनाने या युजरच्या कमेंटचा चांगलाच समाचार घेतला. तिने सडेतोड प्रत्युत्तर देत आपला राग व्यक्त केला. तिने प्रत्युत्तर देत लिहिले की, “आणि तू तुझे चपलीसारखे तोंड घेऊन फिरत आहेस त्याचं काय?” यानंतर या युजरला त्याची चूक समजली आणि त्याने दुसरी कमेंट करत तिला धन्यवाद म्हटले.

यापूर्वीही संजनाने नेटकऱ्याला केले होते ट्रोल
आशिया चषकादरम्यान संजनाने एका ट्रोलरला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. आशिया चषकात भारतीय संघ जसप्रीत बुमराहशिवाय दिसली होती. त्यावेळी संजनाने बुमराहसोबतचा एक फोटो अपलोड केला होता, ज्याबद्दल एका व्यक्तीच्या असभ्य कमेंट केली होती. त्याने लिहिले होते की, “इकडे भारतीय संघ आशिया चषकात पराभूत होतोय आणि बुमराह फिरत आहे.” यावर संजनाने प्रत्युत्तर देत लिहिले होते की, “थ्रोबॅक फोटो आहे, दिसत नाहीये का चोमू?”

संजनाची ही निर्भीडता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. (Jasprit Bumrah Sanjana Ganesan gives a befitting reply to a troller)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुर्दैवच अन् काय! 2021मध्ये पदार्पण करणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंना विसरले राहुल द्रविड, ढुंकूनही नाही बघत
VIDEO: पाकिस्तानी अँकरने ओलांडली हद्द, लाईव्ह शोमध्ये वसीम अक्रमला म्हटले ‘नॅशनल धोबी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---