इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. दोन्ही संघ सध्या या मालिकेत १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात जसप्रीत बुमराहने देखील भारतीय संघाला जोरदार सुरुवात करून दिली.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या १९१ धावांवर संपुष्टात आणला होता. भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज या डावात देखील पुर्णपणे फ्लॉप ठरले होते. प्रत्युत्तरात जसप्रीत बुमराहने देखील एकाच षटकात इंग्लंडच्या सलामीवीरांना माघारी धाडले होते.
हेडिंग्ले कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज रॉरी बर्न्स आणि हमीद यांनी अर्धशतकी खेळी केल्या होत्या. परंतु, ओव्हल कसोटी सामन्यात हे दोघेही स्वस्तात माघारी परतले आहेत.
तर झाले असे की, इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना चौथे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला होता. त्याने या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर रॉरी बर्न्सला त्रिफळाचित करत माघारी धाडले होते. तर याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने हमीदला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले होते.
https://twitter.com/SonySportsIndia/status/1433469439794573315?s=19
भारतीय प्रमुख फलंदाज फ्लॉप
ओव्हल कसोटीत प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाला सुरुवात चांगली करता आली नाही. भारताचे रोहित शर्मा (११), केएल राहुल (१७), चेतेश्वर पुजारा (४), रिषभ पंत (९), अजिंक्य रहाणे (१४) रविंद्र जडेजा(१०) हे प्रमुख फलंदाज मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरले. केवळ विराटने ५० धावा करत थोडीफार झुंज दिली. तसेच, जरी प्रमुख फलंदाज अपयशी ठरले तरी, तळातल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या शार्दुल ठाकूरने मात्र, ताबडतोड फलंदाजी केली. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला १९१ धावा उभारता आल्या.
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारताची फलंदाजी जरी अपयशी ठरली असली, तरी गोलंदाजांनी पहिल्या दिवशी कमाल केली आहे. भारताने इंग्लंडच्या पहिल्या दिवसाखेर ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. भारताकडून पहिल्या दिवशी बुमराहने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले, तर उमेश यादवने २१ धावांवर जो रुटला त्रिफळाचीत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘विराट एकवेळ जार्वोला संधी देईल, पण अश्विनला नव्हे’, ओव्हल कसोटीसाठीच्या संघनिवडीवर चाहते भडकले
‘हे’ ३ विदेशी खेळाडू आयपीएलच्या कोणत्याही संघासाठी ठरतील हुकुमी एक्के, ज्यांना मिळायला हवी एक संधी
ओव्हलचे मैदान दमदार फलंदाजीने गाजवणारे ३ भारतीय फलंदाज, शास्त्रींचाही समावेश






