भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटबाबत खूप गंभीर झाले आहे. त्यामुळेच विराट कोहली आणि रोहित शर्मा वगळता बहुतांश भारतीय क्रिकेटपटू दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) खेळणार आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वीपर्यंत ही स्थिती नव्हती. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांचे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, दोन्ही खेळाडूंनी तंदुरुस्त असूनही रणजी ट्रॉफीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बीसीसीआयने कठोर पाऊल उचलले आणि अय्यर आणि किशनला केंद्रीय करारातून बाहेर काढले. आता याप्रकरणी बीसीसीआय सचिव जय शाह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या दोन क्रिकेटपटूंना केंद्रीय संपर्कातून वगळण्याचा मोठा निर्णय घेतल्याची कबुली दिली. ते म्हणाले की, दोन्ही क्रिकेटपटूंना लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये परतता यावे यासाठी कठोर शिक्षा आवश्यक होती. अय्यर आणि ईशान आगामी दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत, जी 5 सप्टेंबरपासून सुरू होईल. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त होऊन कसोटी संघातून बाहेर पडल्यास, टीम इंडियात सामील होण्यापूर्वी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला पुन्हा सिद्ध करावे लागेल, असेही शाह यांनी स्पष्ट केले. त्यांनी रवींद्र जडेजाचे उदाहरण दिले, जो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणारा एकमेव A+ श्रेणीचा क्रिकेटर आहे.
शाह यांनी एका मुलाखतीत सांगितले की, “जर तुम्ही दुलीप ट्रॉफी संघाकडे पाहिले तर रोहित आणि विराट वगळता इतर खेळाडू खेळतील. कठोर पावले उचलल्यामुळे श्रेयस अय्यर आणि इशान किशन दुलीप ट्रॉफी खेळत आहेत. थोडे शिस्तबद्ध होणे गरजेचे आहे. रवींद्र जडेजा जखमी झाल्यावर त्याला देशांतर्गत सामने खेळण्यास सांगण्यात आले होते. आता दुखापतीमुळे बाहेर असलेला कोणताही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये फिटनेस सिद्ध केल्यानंतरच भारतीय संघात येऊ शकतो हे निश्चित आहे.”
शाह यांनी विराट व रोहित यांना अतिरिक्त भार देण्याची इच्छा नसल्याचे देखील म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्युनियर वॉल! राहुल द्रविडच्या मुलाचा रोहित शर्माच्या स्टाईलमध्ये गगनचुंबी षटकार – Video
रहाणेचा नवा अवतार! इंग्लंडमध्ये षटकारांचा पाऊस पाडत संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवले