सध्या इंग्लंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लडंचा कसोटी संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. उभय संघांत सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना 1 डिसेंबरपासून सुरू झाला. या सामन्यात खेळपट्टी आतापर्यंत फलंदाजीसाठी अनुकूल राहिली आहे. रावलपिंडीत खेळपट्टी फलंदाजांसाठी एवढी अनुकूल आहे की, उजव्या हाताने फलंदाजी करणारा जो रुट थेट डाव्या हाताने फलंदाजी करू लागला.
उभय संघांतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 657 धावा केल्या. तर पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या डावात 579 धावा केल्या. उभय संघांतील या पहिल्या डावात एकूण 7 खेळाडूंनी शतक केले आहे. यापैकी चार शतक इंग्लंड संघाकडून, तर तीन शतके पाकिस्तानच्या फलंदाजांनी केले. इंग्लंडचा दिग्गज जो रुट (Joe Root) याने पहिल्या डावात 23, तर दुसऱ्या डावात 73 धावा केल्या. दुसऱ्या डावात रुट चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसला. यादरम्यान, त्याने काही चेंडू डावखुऱ्या बाजूने खेळले.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावातती 23 व्या षटकात जाहिद महमूद (Zahid Mahmood) गोलंदाजीसाठी आला होता. हे डावातील त्याचे सहावे षटक होते. या षटका रुटने डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपात फलंदाजी करत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने एका जबरदस्त स्वीप शॉट खेळला, जो मिडविकेटवर उभा असलेल्या नसीम शहाच्या हातात गेला, पण त्याला झेल पकडता आला नाही. रुटने 52 धावांवर खेळत असताना त्याला हे जीवनदान मिळाले. त्यानंतर रुटने जोखीम घेतली नाही आणि षटकातील चौथ्या चेंडूपासून तो नेहमीप्रमाणे उजव्या बाजूने फलंदाजी करू लागला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Joe Root decides to bat left-handed 😳#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/GOvnkof54B
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 4, 2022
दरम्यान, जो रूट असा पहिला क्रिकेटपटू नाहीये, ज्याने अशा प्रकारने फलंदाजी केली असेल. यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज सलीम मलिक यांनी 1986 मध्ये फैसलाबाद कसोटी सामन्यात रुटप्रमाणेच फलंदाजी केली होती. तसेच सुनील गावसकर यांनी 1981-82 मध्ये रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाविरुद्ध डावखुऱ्या फलंदाजाच्या रूपात फलंदाजी केली होती.
सामन्याचा विचार केला, तर इंग्लंडने दुसऱ्या डावात 7 बाद 264 धावांवर डाव घोषित केला. पाकिस्तानला शेवटच्या डावात विजयासाठी 343 धावांचे लक्ष्य मिळाले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने 2 विकेट्सच्या नुकसानावर 80 धावा केल्या. शेवटच्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी अजून 263 धावांची आवश्यकता आहे. (Joe Root batted as a left-handed batsman in the first Test match against Pakistan)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हिंमत असेल तर जिंकूनच दाखवा’; स्टोक्सचे पाकिस्तान संघाला पाकिस्तानातच खुले आव्हान
ऑस्ट्रेलियाकडून वेस्ट इंडिज चारीमुंड्या चीत! यजमानांचा पर्थ कसोटीवर 164 धावांनी कब्जा