भारत विरुद्ध इंग्लंड संघात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) पहिला कसोटी सामना चालू आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रापर्यंत ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. यात इंग्लंडचा संघनायक जो रुट याच्या द्विशतकी खेळीचा मोठा हात आहे.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रुटने ३७७ चेंडूत २१८ धावांची धडाकेबाज खेळी केली. यादरम्यान त्याने २ षटकार आणि १९ चौकार मारले. अखेर भारताचा फिरकीपटू शाहबाज नदीम याने त्याला पायचित केले. अशाप्रकारे भारताच्या भूमीत भारताविरुद्ध द्विशतक झळकावत कर्णधार रुटने खास विक्रम केला आहे. तो भारतात द्विशतक करणारा केवळ दुसराच परदेशी कर्णधार ठरला आहे.
त्याच्यापुर्वी वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्लाइव्ह लॉयड यांनी हा किर्तीमान नोंदवला होता. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात जानेवारी १९७५ मध्ये मुंबई येथे मालिकेतील अखेरचा पाचवा कसोटी सामना झाला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचे तत्कालिन कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांनी पहिल्या डावात नाबाद २४२ धावा केल्या होत्या. या खेळीसाठी त्यांनी ४ षटकार आणि १९ चौकार मारले होते.
रुटची महत्त्वपुर्ण विकेट पडल्यानंतर इंग्लंड संघ ६ बाद ४८१ धावांवर आला आहे. यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि गोलंदाज डोम बेस फलंदाजी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
लय भारी! १०० व्या कसोटीत ‘असा’ पराक्रम करणारा जो रुट जगातील पहिलाच क्रिकेटपटू
एक नंबर भावा..! गगनचुंबी षटकारासह द्विशतक साजरं करत रुटने केला ‘हा’ खास रेकॉर्ड
इंग्लंडच्या कॅप्टनचा दीडशतकी धमाका, ब्रॅडमन यांच्या ८४ वर्षांपुर्वीच्या विक्रमाची केली पुनरावृत्ती