साऊथँम्पटन। शुक्रवारी 2019 आयसीसी विश्वचषकात 19 वा सामना इंग्लंड विरुद्ध विंडीज संघात पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 विकेट्सने विजय मिळवला. हा इंग्लंडचा या विश्वचषकातील तिसरा विजय आहे.
इंग्लंडच्या या विजयात जो रुटने अष्टपैलू कामगिरी करत मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात नाबाद 100 धावा तसेच 2 विकेट्स आणि 2 झेल घेतले. विशेष म्हणजे दोन्ही झेल त्याने स्वत:च्याच गोलंदाजीवर घेतले. त्याने विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर आणि शिमरॉन हेटमेयरला स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
रुटच्या या अष्टपैलू खेळीमुळे त्याला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. याबरोबरच त्याने 23 वर्षांपूर्वी विश्वचषकात झालेल्या एका पराक्रमाची बरोबरी केली आहे.
विश्वचषकात एका खेळाडूने शतकी खेळी, 2 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स आणि 2 झेल अशी अष्टपैलू कामगिरी करण्याची घटना दुसऱ्यांदा घडली आहे.
याआधी 1996 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून अरविंद डी सिल्वा यांनी असा पराक्रम केला होता. त्यांनी या सामन्यात 107 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच 42 धावांत 3 विकेट्स घेतल्या होत्या आणि क्षेत्ररक्षण करताना 2 झेलही घेतले होते.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या सामन्यात श्रीलंकेने 7 विकेट्सने विजय मिळवला होता आणि 1996 च्या विश्वषकाचे विजेतेपदही जिंकले होते. या सामन्यात डी सिल्वा यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.
हे खास विक्रमही केले रुटने –
जो रुटचे हे विश्वचषकातील तिसरे शतक आहे. त्यामुळे इंग्लंडकडून विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याच्या केविन पीटरसनच्या विक्रमाला मागे टाकले आहे. पीटरसनने विश्वचषकात 2 शतके केली आहेत.
त्याचबरोबर विश्वचषकाच्या एका सामन्यात शतक आणि 2 विकेट्स घेणारा जो रुट इंग्लंडचा दुसराच क्रिकेटपटू. याआधी 2015 च्या विश्वचषकात स्कॉटलँड विरुद्ध मोईन अलीने 128 धावांची शतकी खेळी आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–बेन स्टोक्सच नाही तर इंग्लडच्या या क्रिकेटपटूनेही घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–गांगुली म्हणतो, असे केले तर पाऊस पडल्यानंतर १० मिनीटात सुरु होईल सामना