मंगळवारी (२४ मे) गुजरात टायटन्स आयपीएलच्या चालू हंगामातील अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला. राजस्थान आणि गुजरात यांच्यातील हा पहिला क्वालिफायर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडला. राजस्थानला रॉयल्सला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानचा जरी पराभव झाला असला, तरी त्यांचा सलामीवीर जोस बटलने मात्र एका खास विक्रमाची नोंद स्वतःच्या नावापुढे केली.
अंतिम सामन्यात जाण्यासाठी राजस्थानला आता दुसरा क्वालिफायर सामना खेळावा लागणार आहे. गुजरात टायटन्सने मात्र या विजयानंतर थेट अंतिम सामन्यात धडक दिली आहे. राजस्थानने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. त्यांचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) मागच्या काही सामन्यांमध्ये त्याच्या लयीत दिसला नाही. परंतु, गुजरातविरुद्ध महत्वाच्या सामन्यात मात्र त्याला त्याचा सूर पुन्हा सापडला. त्याने या सामन्यात ५६ चेंडूत ८९ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तब्बल १२ चौकार, तर दोन षटकार देखील निघाले.
बटलर एखाद्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १५ सामन्यांमध्ये त्याने ५१.२९ च्या सरासरीने आणि १४८.४३ च्या स्ट्राईक रेटने ७१८ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सच्या इतिहासात असा एकही फलंदाज होऊन गेला नाहीये, ज्याने एका आयपीएल हंगामात ७०० धावांचा टप्पा पार केला असेल. पण यावर्षी बटलरच्या रूपात संघाला अशी कामगिरी करणारा फलंदाज मिळाला.
दरम्यान, उभय संघातील या क्वालिफायर एक सामन्यावर नजर टाकली, तर दोन्ही संघांनी विजयासाठी चांगला प्रयत्न केला, पण गुजरातने शेवटच्या षटकात बाजी मारली. विजायासाठी गुजरातला शेवटच्या षटकात १६ धावा लागत होत्या. डेविड मिलरने शेवटच्या ष’कातील पहिल्या तिन्ही चेंडूवर लागोपाठ षटकार मारले आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर गुजरात टायटन्स आता थेट अंतिम सामनयात जागा पक्की केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्समध्ये सॅमसनचीच सत्ता, मोडला अजिंक्य रहाणेचा मोठा विक्रम
हे फक्त आयपीएलमध्येच होऊ शकतं!! एकाच चेंडूवर २ रनआऊट आणि ४ धावा, पाहा लास्ट बॉलचा सावळा गोंधळ