डेव्हिड वॉर्नर शुक्रवारी (12 जानेवारी) हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर आला. वास्तविक, आपल्या भावाच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने सिडनी क्रिकेट मैदानावर उतरला. डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर यांच्यात शुक्रवारी बिग बॅश लीग सामना खेळवला जाणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला डेव्हिड वॉर्नर सिडनी थंडरकडून बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहे.
कसोटी निवृत्तीनंतर डेव्हिड वॉर्नर (David Warner) थंडरसाठी या मोसमात तीन सामने खेळणार आहे, त्यापैकी सिक्सर्सविरुद्धचा आगामी सामनाही त्यापैकी एक आहे. सिडनी थंडरचा वेगवान गोलंदाज आणि वॉर्नरचा सहकारी गुरिंदर संधू म्हणाला, “डेव्हिड आमच्यासाठी येऊन खेळण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्याला इथे असणं आम्हाला आवडतं. गेल्या वर्षी त्याने आमच्यासाठी चमकदार कामगिरी केली, कदाचित त्याने पाहिजे तितक्या धावा केल्या नाहीत, परंतु संघात असल्यामुळे शिकण्यास मदत झाली. तो संघातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. सर्व चाहते त्याच्या क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतात.”
Dave Warner.
In a Helicopter.
Arriving at the SCG.Here's how it happened. @davidwarner31 @ThunderBBL @scg #BBL13 pic.twitter.com/v7QRCkauH5
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2024
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज आंद्रे नेल हाही अशाच प्रकाराने चर्चेत आला होता. 16 जानेवारी 2004 रोजी सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना झाला. तर आंद्रे नेलचे लग्न 17 जानेवारीला होते. अशा स्थितीत त्याच्यासमोर फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. आंद्रे नेल ना लग्न सोडू शकत होता ना सामना. आंद्रे नेलला आधी सामना खेळायचा होता आणि नंतर लग्न करायचे होते. यानंतर आंद्रे नेलने ठरवले की, तो लग्नही करेल आणि क्रिकेटही खेळेल. (Just a mess David Warner directly to the stadium by helicopter to play a cricket match)
हेही वाचा
T20 World Cup: विश्वचषकासाठी टीम इंडियाला सापडला ऑलराऊंडर प्लेअर, पंड्याची जागा धोक्यात!
Ind vs Afg: ‘फक्त माही भाईने सांगितलेलं ऐकतो, त्यामुळे मला गेम फिनीश करणं सोप्पं जातंय’