मंगळवारी (दि. 05 सप्टेंबर) बीसीसीआयने आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. या संघात चेंडू आणि बॅटमधून महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू शार्दुल ठाकूर याच्या नावाचाही समावेश आहे. अशात शार्दुलच्या निवडीवर बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सध्याच्या निवड समितीवर टीकास्त्र डागले आहे. सरासरी पाहून मूर्ख बनू नका, असे श्रीकांत म्हणाले आहेत.
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत (Krishnamachari Srikkanth) यांनी केलेले भाष्य सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. के श्रीकांत (K Srikkanth) म्हणाले, “प्रत्येकजण म्हणत आहे की, आपल्याला 8व्या क्रमांकापर्यंत फलंदाजी हवीये. कोणाला आठव्या क्रमांकाचा फलंदाज हवाय? नेपाळविरुद्ध शार्दुल ठाकूर याने 10 धावा केल्या. 10 षटकांपेक्षाही कमी गोलंदाजी केली. वेस्ट इंडिज किंवा झिम्बाब्वेसारख्या संघांविरुद्धचे प्रदर्शन पाहू नका.”
‘सरासरी पाहून मूर्ख बनू नका’
पुढे बोलताना श्रीकांत म्हणाले, “होय, त्याने चांगले प्रदर्शन केले, तर त्याला लक्षात ठेवा. मात्र, त्याला महत्त्व देऊ नका. म्हणून मी म्हणतो, सरासरी पाहून मूर्ख बनू नका. नेहमी वैयक्तिक सामने पाहा.”
विश्वचषक 2011मधील संघाचे दिले उदाहरण
श्रीकांत यांनी आपण कसे बरोबर, हे सांगण्यासाठी 2011च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील राखीव खेळाडूंचे उदाहरण दिले. श्रीकांत म्हणाले, “2011 विश्वचषक संघ पाहा. मी सांगू का राखीव कोण होते? तिथे दोन फिरकीपटू होते. आर अश्विन, पीयूष चावला आणि मुनाफ पटेल यांच्या रूपात एक मध्यमगती वेगवान गोलंदाज. तसेच, युसूफ पठाणच्या रूपात एक फलंदाज.”
शार्दुल ठाकूरचे प्रदर्शन
भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याच्या प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्याने 2023मध्ये 9 वनडे सामने खेळताना 15 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, त्याने फलंदाजी करताना 5 डावात 9.60च्या सरासरीने आणि 97.95च्या स्ट्राईक रेटने 48 धावाही केल्या आहेत. शार्दुल ठाकूर याची आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघातही निवड करण्यात आली आहे. (K Srikkanth statement on shardul thakur selection in 2023 world cup india squad know here)
हेही वाचाच-
वर्ल्डकपसाठी फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू टीम इंडियात; दिग्गज म्हणाला, ‘तो लकीये, नाहीतर त्याच्या जागी…’
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा सुरू होणार द्विपक्षीय मालिका? बीसीसीआय अध्यक्षांनी केले मोठे विधान