क्रीडाक्षेत्राला धक्का देणारी घटना बुधवारी(१७ मार्च) पहाटेच्या सुमारास घडली आहे. पुणे जिल्ह्यातील कबड्डीपटू प्रवास करत असलेल्या तवेरा गाडीचा आणि कंटेनरची धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात २ कबड्डीपटूंना आपला जीव गमवावा लागला आहे तर २ खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत, असे वृत्त समोर येत आहे.
बुधवारी पहाटे कळंब येथील कबड्डीपटू कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चौरंगी कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात होते. यावेळी हुबळीच्या दिशेने जात असताना विजापूरपासून ५० किलोमीटर अंतरावर पहाटेच्या सुमारात तवेरा आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात सोहेल सय्यद (वय २२ वर्षे) आणि महादेव आवटे (वय २०) या दोन युवा कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन कबड्डीपटू गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे.
तसेच या अपघातात जखमी झालेल्या कबड्डीपटूंना विजापूरजवळीत बंजारा हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती कळताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गंभीर दखल घेत जखमी खेळाडूंना तातडीने उपचार मिळावा, असे सांगितले आहे. हे खेळाडू महाराणा कबड्डी संघातील कबड्डीपटू होते.
या अपघातानंतर पुणे जिल्ह्यातून तसेच कबड्डीविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कबड्डी स्पर्धेदरम्यान धक्कादायक घटना! चालू सामन्यात डोक्यावर आदळल्याने युवकाचा जागीच मृत्यू
प्रो कबड्डी लीगचे आठवे पर्व ढकलले पुढे, आता ‘या’ वर्षी होणार स्पर्धा
‘या’ कारणामुळे कोहलीने आपला क्रमांक ईशान किशनला दिला, फलंदाजी प्रशिक्षकांनी सांगितले कारण