न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. या सामन्यात शानदार फलंदाजी करणारा यजमान संघाचा स्टार फलंदाज केन विल्यमसन पुन्हा एकदा नर्व्हस नाईंटीजचा बळी ठरला. 93 च्या धावसंख्येवर तो 61व्या षटकात ऍटकिन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचा दुसरा चेंडू जॅक क्रॉलीने झेलला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विल्यमसन शतकाच्या जवळ येऊन 90च्या धावांवर बाद होण्याची 13वी वेळ आहे. यासह, तो सर्वाधिक वेळा नर्व्हस नाईंटीजचा बळी ठरणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे.
या यादीत त्याने टीम इंडियाची भिंत म्हटल्या जाणाऱ्या माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला मागे टाकला आहे. द्रविड त्याच्या कारकिर्दीत 90 च्या धावांवर 12 वेळा बाद झाला होता.
क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर 90 च्या धावांवर आऊट झालेल्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मास्टर ब्लास्टर 90 च्या धावांवर त्याच्या कारकिर्दीत एकूण 27 वेळा बाद झाला. सचिनने आपल्या कारकिर्दीत ही 27 शतके पूर्ण केली असती तर त्याच्या नावावर 100 ऐवजी 127 आंतरराष्ट्रीय शतके झाली असती.
KANE WILLIAMSON MISSED HUNDRED BY JUST 7 RUNS 💔
– In his return to Test cricket after a long injury break, Williamson dismissed for 93 runs, a great knock under pressure from the main man of New Zealand, What a player. pic.twitter.com/yrKMxgqJW3
— Johns. (@CricCrazyJohns) November 28, 2024
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 च्या स्कोअरवर सर्वाधिक वेळा बाद झालेले फलंदाज-
27 – सचिन तेंडुलकर
13 – केन विल्यमसन
12 – राहुल द्रविड
12 – एबी डिव्हिलयर्स
11 – मॅथ्यू हेडन
11 – रिकी पाँटिंग
10 – वीरेंद्र सेहवाग
10 – शिखर धवन
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने पहिल्या दिवशी 8 गडी गमावून 319 धावा केल्या होत्या. सध्या टीम साऊदी आणि ग्लेन फिलिप्स (41 धावांसह) सोबत क्रीजवर उपस्थित आहेत. केन विल्यमसन शिवाय आतापर्यंत एकाही फलंदाजाला न्यूझीलंडकडून 50 धावांचा टप्पा गाठता आलेला नाही. इंग्लंडकडून गोलंदाजीत शोएब बशीरने सर्वाधिक 4 बळी घेतले.
हेही वाचा-
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघात अष्टपैलूचा खेळाडूचा समावेश
IPL 2025: श्रेयस अय्यर कर्णधार तर मधल्या फळीत मॅक्सवेल-स्टॉइनिस, पाहा पंजाब किंग्जची प्लेइंग 11
IND VS AUS; भारतासाठी इतिहास रचण्यापासून बुमराह 10 विकेट्स दूर, याबाबतीत गाठणार अव्वल स्थान