भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने आघाडी घेतलीये. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता, भारताचे युवा खेळाडू देखील शानदार कामगिरी करतायेत. मागील दोन वर्षात भारताकडून बऱ्याच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्यामुळे संघाची बँक स्ट्रेंथ मजबूत दिसून येते. त्याच मुद्द्याला धरून आता भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व गाजवत दोन्ही सामने खिशात घातले. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघात बदल दिसून येऊ शकतात. तसेच, टी20 मालिकेतही युवा खेळाडूंनाच अधिक संधी मिळेल. भारतीय संघाच्या याच बेंच स्ट्रेंथचा विचार करता कपिल देव यांनी एक वक्तव्य केले.
एका खासगी कार्यक्रमात सहभागी झालेल्या कपिल यांनी म्हटले,
“आत्ता जगभरातील क्रिकेटमध्ये भारतीय संघ सर्वात मजबूत दिसून येतो. आपली क्रिकेटप्रणाली सर्वोत्तम आहे. मागील दोन वर्षात आपण अनेक खेळाडूंना संधी दिली. आत्ता आपल्याकडे इतके प्रतिभावंत क्रिकेटपटू तयार आहेत की, आपण एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तीन वेगवेगळे संघ उतरवू शकतो.”
मागील दोन वर्षात भारतीय संघाच्या वनडे व टी20 संघात प्रत्येकी 18 खेळाडूंनी पदार्पण केले आहे. तसेच, टी20 विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय टी20 संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या करताना दिसतोय. सध्या तरी टी20 संघात विराट कोहली, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी या अनुभवी खेळाडूंना स्थान नाही. तसेच, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना कसोटी संघाच्या आसपास ठेवले जात आहे.
(Kapil Dev Said India Have Luxury To Play Three Different Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला म्हणतात जुडवा! स्वत:सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून सुनील नारायणही झाला हैराण, पाहा व्हिडिओ
भारत- न्यूझीलंडसाठी ‘करो वा मरो’ सामना, कोण कोणावर भारी? एका क्लिकवर घ्या जाणून