सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीचा हंगाम सुरू आहे. यातील ई गटातील सामने रांची येथील झारखंड क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळले जात आहेत. याच गटात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रासाठी खेळणारा भारतीय संघाचा वरिष्ठ अष्टपैलू केदार जाधव याने रांची येथे पोहोचतात थेट भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे फार्म हाऊस गाठले. तेथील काही छायाचित्रे केदारने सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत.
https://www.instagram.com/p/ClJJ32MrL1r/?igshid=YmMyMTA2M2Y=
रांची येथे आलेल्या केदारने धोनीच्या फार्म हाऊसला भेट दिली. धोनी व केदार भारतीय संघात अनेक वर्ष एकत्र क्रिकेट खेळले आहेत. तसेच, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी देखील त्यांनी एकत्रित योगदान दिले. धोनीच्या फार्म हाऊसवर पोहोचलेल्या केदारने पोस्ट केलेल्या छायाचित्रात धोनी व केदार कॉफी घेतलेले दिसतायेत. तर त्यांच्या बाजूला एक घोडी उभी आहे. केदारने या छायाचित्राला कॅप्शन देत लिहिले, ‘माहीभाई, मी व सुनहरी” सुनहरी हे धोनीच्या घोडीचे नाव आहे.
केदार जाधव हा अनेक वर्ष भारतीय संघासाठी क्रिकेट खेळला आहे. मात्र, मागील जवळपास तीन वर्षापासून त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्याने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 2020 च्या सुरुवातीला खेळलेला. त्यानंतर मागील दोन वर्षापासून आयपीएलमध्ये देखील त्याची दखल घेतली गेली नाही. एका वर्षाच्या कालखंडानंतर तो आता यंदा देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उतरला आहे.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्त झालेला धोनी पुढील वर्षी अखेरच्या वेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्या दृष्टीने त्याने सराव देखील सुरू केला आहे.
(Kedar Jadhav Meet MS Dhoni At His Farm House)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीची अपराजित मालिका खंडित; केरला बास्टर्सने दिला पराभवाचा धक्का
ठरलं एकदाचं! खुद्द वडिल सुनील शेट्टीने केले केएल राहुल-आथिया शेट्टीच्या लग्नाबाबत मोठे वक्तव्य