केपी, तू जन्माने आफ्रिकन आणि कर्माने इंग्लिश, आई इंग्लिश आणि वडील आफ्रिकन.
2005 ला ऍशेश सिरीजमध्ये इंग्लंडकडून पहिलाच कसोटी सामना एजबस्टनला खेळताना मॅकग्राला जाम धुतला होता तू. त्यावेळेस मॅकग्राची तशी हवाच होती हुकमी स्विंगर होता ऑस्ट्रेलियाचा तो. पदर्पणात अर्धशतक झळकावले आणि इथेच इंग्लंड क्रिकेटला ऑस्ट्रेलियन टिमला हरवण्यासाठी नवा आत्मविश्वास गवसला. याच सिरीजने ऍशेशच्या इतिहासात एक नवीन अध्याय रचला.
या सिरीजच्या अखेरच्या सामन्यात तू लोर्ड्सवर केलेली शतकी खेळी अविस्मरणीय खेळी होती. ब्रेट लीला मारलेली स्ट्रेट ड्राईव्ह आजही आठवते, शेन वॉर्नला स्टेपआऊट करत मारलेले सिक्स आणि मॅकग्रासहित सगळ्यांची केलेली धुलाई.
2008ला ओव्हलच्या मैदानावर आफ्रिकेच्याविरुद्ध कसोटी सामन्यात केलेली 152 धावांची तुफानी खेळी ही बहारदार होती. डेल स्टेन, मॉर्कलही तुझ्या बॅटच्या तडाख्यातून सुटला नाही. या खेळीनंतर द टाईम्सने ‘द मोस्ट कम्प्लिट बॅट्समन इन क्रिकेट’ असं वर्णन केलं होतं तुझं.
एक दिवसीय सामन्यांत सर्वात फास्ट 1000 आणि 2000 धावा काढणारा जगातील पहिला बॅट्समन तूच. 50च्या आसपासच्या सरासरीने दोन्ही प्रकारांत तू धावा काढल्यात. पहिल्या 25 टेस्टमध्ये सर्वाधिक धावा काढणारा ब्रॅडमन नंतर तूच.
जगाला स्विच हिटचा नवीन प्रकार तूच माहीत करून दिला. इंग्लिश क्रिकेटला भरभरून दिलं पण त्यांना ते पचवताना त्रास झाला याच कारणही तसंच तू जन्माने इंग्लिश नव्हतास. कॅप्टन झाल्यावर पीटर मूर बरोबर तुझं वाजलं आणि तूला संघातून काढण्यात आलं. त्याचं कारण न पटण्यासारखेच होतं. इंग्लंड क्रिकेटने स्वतःच्या पायावर धोंडा पाडायचे ठरवूनच घेतलं होतं.
बरं हे सगळं आता भूतकाळात गेलं आहे. आठवण एवढ्यासाठीच की, मंगळवारी (दि. 27 जून) तुझा 42वा वाढदिवस आहे.
-स्वप्नील ढवळे यांचा हा खास ब्लॉग बर्थडे बॉय केविन पीटरसनवर
महत्वाच्या बातम्या-
जगात 5000 पेक्षा अधिक क्रिकेटर झाले, पण ‘असे’ दोन विक्रम करणारा डेल स्टेन मात्र एकटाच
झिम्बाब्वेने वनडे क्रिकेटमध्ये रचला इतिहास! भारताचा ‘हा’ रेकॉर्ड मोडण्यासाठी फक्त 14 धावा पडल्या कमी