सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. संघादरम्यान खेळाडूंच्या परस्पर अदलाबदलीसाठी असणारी ट्रेड विंडो खुली करण्यात आली असुन काही खेळाडूंची अदलाबदली देखील झाली आहे. या स्पर्धेत बऱ्याच खेळाडूंच्या जर्सीचे रंग नेहमी बदलतात. मात्र, असेही काही खेळाडू आहेत जे त्या संघाची ओळख बनले आहेत. जर हे खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसले तर प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्काच असेल. आपण अशाच खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत ज्यांची एका विशिष्ट संघासोबत नाळ जोडली गेली आहे.
कायरन पोलार्ड-
मुळचा वेस्ट इंडिजचा असलेला कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याने आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघामध्ये बराच काळ घालवला आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी आतापर्यंत 211 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत जिंकलेल्या 5 आयपीएल चषकांमध्ये पोलार्डचा सिंहाचा वाटा होता. आयपीएलच्या काही अंतिम सामन्यांमध्ये पोलार्डने एकट्याच्या फलंदाजीच्या बळावर संघासाठी विजयश्री खेचून आणली होती. पोलार्डने आयपीएलमधून निवृत्ती जरी घेतलेली असली तरी तो मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहे.आयपीएलमध्ये खेळलेल्या 189 सामन्यात 147च्या स्ट्राइक रेटने 3412 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजीत 69 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
एबी डिवीलीयर्स-
दक्षिण आफ्रिकेचा एबी डिवीलियर्स (AB De Villiers) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघासाठी सर्वाधिक सामने खेळला आहे. आरसीबीसाठी खेळताना त्याने 157 सामने खेळले. आरसीबीसाठी खेळताना त्याने 151 च्या स्ट्राईक रेटने 5162 धावा केल्या आहेत.
लसिथ मलिंगा-
श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) 2008 पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी आतापर्यंत 139 सामने खेळले आहेत. 2018 मध्ये मुंबई इंडियन्स संघाने त्याला रिलीज करत संघाचा गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून घेतलेले. त्यानंतर 2019 मध्ये संघात त्याचे पुनरागमन झाले. 2019 आयपीएलच्या अंतिम सामन्यात त्याने शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवत संघाला आयपीएल जेतेपद मिळवून दिले.
सुनिल नरेन-
वेस्ट इंडिजच्या सुनिल नरेन (Sunil Narine) याने आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळले आहेत. तो 2017मध्ये कोलकाता संघाशी जोडला गेला होता. त्याला मिस्ट्री स्पिनर म्हणून देखील ओळखले जाते.
जीतन पटेल-
न्यूझीलंडच्या जीतन पटेल (Jeetan Patel) याने काउंटी क्रिकेट खेळताने वार्विकशायर या संघासाठी 139 सामने खेळले आहेत. जीतन या संघाला 2011 मध्ये जोडला गेलेला.(Kieron Pollard has played most matches for Single franchise that is Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘ही’ गोष्ट बदला, कर्णधार बदलून काय होणार, टीम इंडियाला इरफान पठाणचा सल्ला
केकेआरच्या ‘या’ खेळाडूची आयपीएलमधून माघार, कारण घ्या जाणून