भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या घरात वेळ घालवत आहे. विराटने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसरबरोबर नुकत्याच झालेल्या चर्चेत आपण आपल्या परिवारासोबत या वेळेचा आनंद घेत असल्याचे सांगितले होते.
पीटरसनबरोबर (Kevin Pietersen) झालेल्या इंस्टाग्राम लाईव्ह (Instagram Live) दरम्यान विराटला आपल्या आवडत्या समालोचकाबद्दल त्याने प्रश्न विचारला की, “तू याचे उत्तर कसे देशील मी (पीटरसन) येथे आहे, त्याची काळजी घे, कारण हे शेवटी तुझ्यासाठी चांगले ठरणार नाही. तुझा आवडता समालोचक (Commentator) कोण आहे?”
यावेळी विराटने उत्तर दिले की, “माझ्या आवडत्या समालोचकाचे नाव सांगणे अतिशय सोपे आहे. केपी नक्की माझा आवडता समालोचक तु नाहीस. माझे आवडते समालोचक नासिर हुसेन (Nasser Hussain) आहेत.”
यावेळी विराटने (Virat Kohli) नासिर यांचे नाव घेतले तेव्हा पीटरसन म्हणाला की, “एकदम बरोबर आहे. तू प्रश्नाचे उत्तर देण्यास खूप वेळ घेतला. धन्यवाद. हे ठीक आहे.”
विराटने पीटरसन बरोबर अनेक विषयांवर चर्चा केली. तसेच त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लिओनेल मेस्सी (Lionel Messi) यांच्यातील आवडत्या खेळाडूचीही निवड केली.
“मला रोनाल्डोचे काम आवडते. त्याच्यामध्ये इतर अनावश्यक गोष्टींना दुर्लक्षित करण्याची क्षमता आहे,” असेही विराट यावेळी म्हणाला.
विशेष म्हणजे विराट आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) त्यांच्या फार्म हाऊसमध्ये राहतात. तिथे त्यांना फिरण्यासाठी थोडी फार जागाही मिळते. विराटकडे अशा कठीण परिस्थितीत अशी जागा असल्यामुळे त्याने धन्यवाद दिला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-५ भारतीय क्रिकेटपटूंची अतिशय वादग्रस्त वक्तव्य, ज्यामुळे देशात झाला होता राडा






