नवी दिल्ली । कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराने भारतात सर्वाधिक नुकसान कामगारांचे झाले आहे. त्यांच्याकडे पैसे नाहीत आणि आपल्या घरी परतण्यासाठी साधनदेखील नाही. गरीब कामगार आपल्या परिवारांबरोबर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले आहेत.
तापत्या उन्हात चालतात तसेच रात्री जीवाला धोका असूनही चालत राहतात. कामगारांची अशी अवस्था पाहून एका क्रिकेटपटूला त्यांची दया आली असून तो त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
आयपीएलमधील फ्रंचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) अष्टपैलू क्रिकेटपटू तजिंदर सिंग ढिल्लाँने (Tajinder Singh Dhillon) आतापर्यंत आपल्या गावाच्या दिशेने पायपीट करणाऱ्या १०,००० पेक्षा अधिक कामगारांंच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
एकही आयपीएल सामना न खेळलेला हा खेळाडू मुंबई इंडियन्स संघाचाही भाग होता.
रस्त्यावर उतरला तजिंदर-
राजस्थानमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तजिंदरने आपल्या घरापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या गरीब प्रवाश्यांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या वेबसाईटनुसार तजिंगर म्हणाला की, “कानपूरकडे जाणारा मुख्य महामार्ग माझ्या घरापासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे. माध्यमांतील काही वृत्तांमध्ये सांगितले की, याचा वापर कामगार आपल्या घरी परतण्यासाठी करत आहेत.”
“मी आपल्या नातेवाईकांशी चर्चा केली की, आपल्याला या कामगारांची मदत केली पाहिजे. कारण अनेकांकडे चप्पलदेखील नव्हती. यानंतर मी त्या क्षेत्रात राहणाऱ्या आपल्या मित्रांशी चर्चा केली आणि आम्ही प्रवाश्यांसाठी जेवणाची सोय करण्याची योजना तयार केली,” असेही तो पुढे म्हणाला.
तजिंदर इतर लोकांकडेही मदतीसाठी गेला. जेणेकरून प्रवाश्यांंसाठी भाजी आणि चपाती बनवता येईल. तो म्हणाला की, “आमच्या भागात एका व्यक्तीचा फळभाज्यांचा व्यवसाय आहे आणि मी त्याच्याकडून भाजी बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात बटाटे देण्यास सांगितले आहे. याव्यतिरिक्त आम्ही ५० किलो पीठदेखील जमा केले आहे. त्याचे वाटप आम्ही आमच्या कॉलनीतील अनेक घरांमध्ये एकसमानरित्या केले आहे. जेणेकरून ते त्याच्यातून चपाती बनवतील. यानंतर आमच्याकडे वितरणासाठी जवळपास १४०० चपात्या आणि पुऱ्या होत्या.”
पोलीस अधिकारी जमावाला नियंत्रित करत होते. तसेच तजिंदर आणि त्याचे सहकारी प्रवासी कामगारांमध्ये (Migrant workers help) जेवण वाटत होते. तो म्हणाला की, “पहिल्या दिवशी आमच्याकडे १,००० प्रवाश्यांना जेवणाचे वाटप केले होते. दुसऱ्या दिवशी ही संख्या वाढून ५,००० झाली होती. यामध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश होता. आम्ही बटाटा पुरीव्यतिरिक्त दूध आणि सरबतदेखील दिले. आम्ही मागील ५ दिवसांपासून लोकांच्या जेवणाची व्यवस्था करत आहोत.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-केवळ १ टी२० सामना खेळणारे जगातील ५ प्रसिद्ध क्रिकेटर
-ना विराट, ना रोहित, ना सचिन; फक्त विरुच्या नावावर आहे हा खास विक्रम
-१० भारतीय दिग्गज क्रिकेटपटू व त्यांच्या एक्स गर्लफ्रेंड्स