नवी दिल्ली| किंग्ज इलेव्हन पंजाब (केएक्सआयपी) संघ आयपीएलमधील आपले पहिले विजेतेपद जिंकण्याच्या प्रतीक्षेत आहे. केएल राहुल याच्यावर प्रतिष्ठित टी -२० लीग आयपीएलच्या १३ व्या सत्रात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
या लीगची सुरूवात युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून होईल. त्याआधी बऱ्याच संघांनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन सरावाला सुरुवात केली आहे. यामध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचाही समावेश आहे. सराव सत्रात पंजाब संघाचे खेळाडू परिश्रम घेत आहेत. तसेच यावेळी विश्रांती घ्यायला ते समुद्रकिनार्यावर गेले आहेत.
पंजाबच्या फ्रेंचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात खेळाडू खासगी समुद्रकिनाऱ्यावर मजा करताना दिसतात. किंग्ज इलेव्हन पंजाबने ट्विट केले की, ‘सरावादरम्यान थोडी मजा आवश्यक आहे.’
Training de ‘beach' thoda fun vi jaruri hai 😉#Dream11IPL #SaddaPunjab pic.twitter.com/fzUK158c7j
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 1, 2020
व्हिडिओमध्ये प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. स्टार फलंदाज मयंक अगरवाल खुर्चीवर विश्रांती घेत असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आपले छायाचित्रण कौशल्य दाखवत आहेत. त्यांनी मोहम्मद शमीचा त्याच्या तळहातामध्ये चंद्र धरुन ठेवलेल्या भास होत असलेला फोटो देखील क्लिक केला.
व्हिडिओमध्ये कुंबळे म्हणतात, “शमीच्या हातात चंद्र, नील आर्मस्ट्राँग नंतर शमी चांद्राजवळ”.
भारतातील वाढत्या कोरोना प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे. यासाठी सर्व संघ युएईमध्ये पोहोचले आहेत आणि सरावात व्यस्त आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी – मुबंई इंडियन्सला धक्का! लसिथ मलिंगा आयपीएलच्या १३ व्या हंगामातून बाहेर
‘तुम्ही इथे मजा मस्ती करायला नाही, आयपीएल खेळायला आलाय,’ विराट कोहली संतापला
‘सुरेश रैनासाठी पैसा महत्त्वाचा नाही’, दिग्गजाची सीएसकेच्या संघमालकावर कडाडून टीका
ट्रेंडिंग लेख –
काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!
आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल
बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!