कट्टर विरोधक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघातील सामन्याने काल (१९ सप्टेंबर) आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात झाली. आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये या हंगामातील दूसरा आयपीएल सामना खेळला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब या संघांमध्ये हा सामना होणार आहे.
भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता हा सामना खेळला जात आहे. तत्पुर्वी पंजाबचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. Kings XI Punjab Won The Toss Against Delhi Capitals And Opted To Field First
आजच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार राहुलने विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलेले नाही. तर २० वर्षीय युवा भारतीय फिरकीपटू रवि बिश्नोई पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार आहे. हा बिश्नोईचा आयपीएल पदार्पणाचा आहे. त्याच्याव्यतिरिक्त कृष्णप्पा गौतम या फिरकीपटूलाही संघात स्थान देण्यात आले आहे.
असा आहे किंग्स इलेव्हन पंजाब संघ-
केएल राहुल (कर्णधार), मयंक अगरवाल, करुन नायर, निकोलस पूरन, सरफराज अहमद, ग्लेन मॅक्सवेल, कृष्षप्पा गौतम, क्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, मोहम्मद शमी आणि रवि बिश्नोई
असा आहे दिल्ली कॅपिटल्स संघ-
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर, मार्क स्टोअनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, कागिसो रबाडा, ऍनरिच नॉर्ट्जे आणि मोहित शर्मा
महत्त्वाच्या बातम्या-
-‘या’ खेळाडूच्या कामगिरीमुळे सामन्यात पडला फरक; सेहवागने दिली प्रतिक्रिया
-एकतर षटकार मारेन किंवा बाद होईल ही मानसिकता घेऊनच खेळलो; पहा कोण म्हणतंय
-‘या’ संघाच्या कर्णधाराला हवंय खास गिफ्ट, जे बनवेल त्याचा आयपीएल हंगाम खास
ट्रेंडिंग लेख-
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-कहर धोनीचा! पहिल्याच आयपीएल सामन्यात नावावर केले एक-दोन नव्हे तर ३ किर्तीमान
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा