---Advertisement---

केकेआरचा पराभवाचा ‘चौकार’, कर्णधार मॉर्गनने व्यक्त केली निराशा; सांगितली कुठे झाली चूक

On: रविवार, एप्रिल 25, 2021 9:29 AM
---Advertisement---

आयपीएल 2021 मधील 18 वा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीस आलेल्या कोलकता संघातील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्यामुळे या संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावत 133 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान संघाने संयमी फलंदाजी करत 18.5 षटकात सहा गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यानंतर कोलकाता संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गनने पराभवाबाबत बोलताना संघातील काही खेळाडूंना यासाठी जबाबदार धरले आहे.

हंगामातील चौथ्या पराभवानंतर सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना मॉर्गन म्हणाला की, “आमच्या संघातील फलंदाजांनी या सामन्यात आम्हाला निराश केले. या सामन्यात आमच्या हेतूमध्ये कमीपणा जाणवला. आम्ही सुरुवातीपासूनच या सामन्यात मागे पडलो होतो. त्यामध्ये आमच्या गोलंदाजांना राजस्थान संघातील फलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी पुरेशी धावसंख्या आम्हाला उभी करता आली नाही.”

“विरोधी संघातील खेळाडूंनी खेळपट्टीला समजून घेऊन चांगली कामगिरी केली. या सामन्यात आम्ही 40 धावांनी मागे पडलो. कारण 20 षटकांच्या सामन्यांत 40 धावा खूप असतात. त्यामुळे आम्हाला डोके शांत ठेवून हेतूपुर्वक खेळावे लागेल. आम्हाला वाटते की, खेळाडूंनी फ्री – फ्लोइंग क्रिकेट खेळावे परंतु या सामन्यात आम्हाला ते जमले नाही,” असे त्याने पुढे म्हटले.

या सामन्याबाबत सांगायचे झाले तर, या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीकरीता आलेल्या कोलकाता संघातील फलंदाजांना उच्च धावसंख्या फलकावर लावण्यात अपयश आले. त्यामुळे कोलकाता संघाला राहुल त्रिपाठीच्या 36 धावांच्या खेळीच्या जोरावर कशीबशी 133 धावांपर्यंत मजल मारता आली. अन्यथा एकाही खेळाडूला चांगली कामगिरी करता आली नाही.

यावेळी राजस्थानच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. यामध्ये क्रिस मॉरिसने 4 षटकांत 23 धावा देऊन 4 बळी घेतले आणि कोलकता संघातील फलंदाजांना मोठा धावसंख्या करण्यापासून रोखले. तर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान संघाने कर्णधार संजू सॅमसनच्या 43 धावांच्या खेळीमुळे 18.5 षटकांत 4 गडी गमावत आयपीएल 2021 मधील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात राजस्थानकडून शानदार गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या क्रिस मॉरिसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

RRvKKR: ४ षटक, ४ विकेट्स; ख्रिस मॉरिसचे पैसावसूल प्रदर्शन; कर्णधाराने ‘या’ शब्दांत केलं कौतुक

सकारियाने हवेत उडी मारत टिपला अविश्वसनीय झेल, मग भन्नाट सेलिब्रेशन करत वेधले सर्वांचे लक्ष; बघा व्हिडिओ

कमिन्सचा जोरदार बाउन्सर आदळला बटलरच्या हेल्मेटवर, थांबवावा लागला सामना; पाहा तो क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---