---Advertisement---

केकेआरच्या अडचणीत वाढ, ‘या’ कारणामुळे सर्वात महागड्या खेळाडूची उर्वरित हंगामातून माघार

On: बुधवार, ऑगस्ट 4, 2021 6:54 PM
---Advertisement---

आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मे महिन्यात आयपीएलला स्थगिती देण्यात आली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. परंतु आयपीएलचे दुसरे सत्र सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासाठी एक दुःखद बातमी समोर आली.

केकेआरचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलच्या दुसऱ्या सत्रातून त्याचे नाव मागे घेतले आहे. याबाबत कारण देत तो म्हणाला, “मी आयपीएलच्या दुसऱ्या सत्रासाठी हजेरी नाही लावू शकत. कारण माझी पत्नी गरोदर आहे. आयपीएलच्या काळातच तिची प्रसूती होण्याची शक्यता आहे. अशावेळी जर मी आयपीएल खेळायला गेलो तर, मला पुन्हा ऑस्ट्रेलियात यायचे झाल्यास २ आठवडे विलगीकरणात राहावे लागेल. त्यानंतर मला यूएईमध्ये सुद्धा जायचे आहे. पुन्हा तिथे जाऊन विलगीकरणात राहावे लागणार व हे खूप किचकट आहे.”

मे महिन्यात आयपीएलला कोरोनामुळे स्थगिती देण्यात आली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. तेव्हा त्यांना आधी मालदीवला हलविण्यात आले व तिथे विलगीकरणात ठेवून मग ऑस्ट्रेलियाला रवाना केले गेले होते.

पॅट कमिन्स हा केकेआरचा एक प्रमुख गोलंदाज आहे. कारण केकेआरने त्याच्यावर खूप मोठी बोली लावून (१५.५ कोटी) त्याला संघात सामील केले होते. तसेच संघातील तो एक अनुभवी गोलंदाज आहे. अशात त्याचे आयपीएल धून नाव मागे घेणे हे केकेआरच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे.

दरम्यान, आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी आयपीएलचे संघ लवकरच युएईला रवाना होतील. त्याबाबत सर्व संघांची जोरदार तयारी चालू आहे.

महत्वाच्या बातम्या –
ENGvIND: भारताची प्लेइंग इलेव्हन पाहून भडकले नेटकरी, ‘या’ खेळाडूला बाहेर केल्याने घेतला समाचार
मैत्री असावी तर अशी! दिवंगत मित्रासाठी इंग्लंड-भारत पहिल्या कसोटीदरम्यान राखून ठेवली खुर्ची
आजवर एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेल्या आरसीबीला कधी रामराम ठोकणार? डिविलियर्स म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---