आयपीएल 2023 मध्ये एप्रिल रोजी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना 3.30 वाजता मोहाली येथे पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळला गेला. या सामन्यात फलंदाजांनी चांगलीच फटकेबाजी केली. त्याचवेळी पंजाब किंग्स संघ फलंदाजी करत असताना, एक अशी घटना घडली, ज्यामुळे पंचांना माफी मागावी लागली.
मोहाली येथील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पंजाबसाठी युवा सलामीवीर प्रभसिमरन गिल याने आक्रमक 23 धावा केल्या. त्यानंतर आलेल्या भानुका राजपक्षेने वेगवान फलंदाजी करताना 32 चेंडूंवर 50 धावांची खेळी केली. कर्णधार शिखर धवनने 40, जितेश शर्माने 21, रझाने 16 व करनने नाबाद 26 धावा करून संघाला 5 बाद 191 अशी मजल मारून दिली. केकेआरसाठी साऊदीने 2 बळी टिपले.
त्याचवेळी या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्यामध्ये पंचांचाच गोंधळ उडालेला दिसला. पंजाबच्या डावातील नववे षटक अष्टपैलू शार्दुल ठाकूर हा टाकत होता. या षटकातील पाच चेंडू झाल्यानंतर पंचांनी षटक समाप्तीची घोषणा केली. त्यावेळी सर्व क्षेत्ररक्षकांनी आपली जागा बदलली. तसेच चेंडू देखील नवीन गोलंदाजाकडे सोपवण्यात आला होता. मात्र, तिसऱ्या पंचांनी हे षटक समाप्त न झाल्याचे टिपले. त्यांनी तात्काळ मायक्रोफोनवरून पंच ब्रुस ऑक्सनफोर्ड यांना षटकातील एक चेंडू शिल्लक असल्याचे सांगितले. पंचांनी माफी मागत शार्दुलला पुन्हा गोलंदाजासाठी बोलावले. या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही.
असे असले तरी हे षटक केकेआर संघासाठी महागडे ठरले. या षटकात एकूण 12 धावा निघाल्या. राजपक्षे याने दोन चौकार या षटकात मारले होते. या षटकात एक नो बॉल आल्याने पंचांचा गोंधळ उडाला होता.
(KKRvPBKS Umpiring Error Shardul Thakur Five Bowl Over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात झाली धोनीला दुखापत? प्रशिक्षक म्हणतायेत, “वयाच्या या टप्प्यावर…”
“तो संघात असल्यावर काळजी नसते”, कर्णधार हार्दिककडून राशिदचे तोंडभरून कौतुक