हैद्राबाद। कालपासून (6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात(India vs West Indies) 3 सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 208 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 6 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात भारताकडून केएल राहुलने (KL Rahul) अर्धशतकी खेळी करताना खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 40 चेंडूत 62 धावा केल्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 4 षटकार मारले. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 1000 धावा(1000 runs in T20Is) पूर्ण करण्याचा टप्पा पार केला आहे.
हा टप्पा पार करणारा तो केवळ सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम रोहित शर्मा(Rohit Sharma), विराट कोहलीVirat Kohli), एमएस धोनी(MS Dhoni), सुरेश रैना(Suresh Raina), शिखर धवन(Shikhar Dhawan) आणि युवराज सिंग(Yuvraj Singh) या भारतीय क्रिकेटपटूंनी केला आहे.
MILESTONE ????
1000 T20I runs for @klrahul11 ????????
He is the 7th Indian batsman to achieve this feat. pic.twitter.com/8oCWlpfDYg
— BCCI (@BCCI) December 6, 2019
तसेच राहुलने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा 29 डावात पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
त्याने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या फलंदजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऍरॉन फिंचची बरोबरी केली आहे. फिंचनेही 29 डावात 1000 टी20 धावा केल्या होत्या.
तसेच या यादीत पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम आहे. आझमने 26 डावात 1000 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने 27 डावात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.
राहुलच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 29 डावात 43.16 च्या सरासरीने 1036 धावा आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 7 अर्धशतकांचा सामावेश आहे.
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू (Most T20I runs for India)–
2547 धावा – रोहित शर्मा
2544 धावा – विराट कोहली
1617 धावा – एमएस धोनी
1605 धावा – सुरेश रैना
1504 धावा – शिखर धवन
1177 धावा – युवराज सिंग
1036 धावा – केएल राहुल
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारे क्रिकेटपटू( fastest to 1000 runs in T20Is) –
26 डाव – बाबर आझम
27 डाव – विराट कोहली
29 डाव – ऍरॉन फिंच
29 डाव – केएल राहुल
हैद्राबाद टी२०मध्ये सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीने केला असाही एक विश्वविक्रम
वाचा????https://t.co/JssI5f3TL9????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019
किंग कोहलीची पॉटिंगच्या विक्रमाची बरोबरी; आता केवळ हा दिग्गज आहे पुढे
वाचा????https://t.co/9odoM7vwfx????#म #मराठी #INDvWI #Cricket @Mazi_Marathi @MarathiBrain #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) December 7, 2019