---Advertisement---

मॅक्सवेलने केली तुफानी खेळी अन् केएल राहुल ट्रोल; भन्नाट मिम्स व्हायरल

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या वनडे सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. कर्णधार ऍरॉन फिंच व स्टीव स्मिथ यांनी शतके ठोकत, ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलने १९ चेंडूत ४५ धावांची तुफानी खेळी करत, ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाची मदत केली. मॅक्सवेलच्या या खेळीनंतर क्रिकेट चाहते भारताचा यष्टीरक्षक केएल राहुलला चांगलेच ट्रोल करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर राहुलला ट्रोल करणारे अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.

मॅक्सवेलने पहिल्या सामन्यात केली होती धुवाधार फलंदाजी

सिडनी येथील पहिल्या वनडे सामन्यात मॅक्सवेलने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत १९ चेंडूत ४५ धावा ठोकल्या. यात ५ चौकार व ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. मॅक्सवेलच्या खेळीनंतर त्याच्या आयपीएल संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलला अनेकांनी ट्रोल केले आहे. कारण मॅक्सवेलला आयपीएल २०२० मधील १३ सामन्यात एकही षटकार ठोकता आला नव्हता. मॅक्सवेलने आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

प्रशिक्षक जाफरने देखील केले राहुलला ट्रोल

किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक असलेला वसिम जाफर हा देखील स्वतःला मिम शेअर करण्यापासून रोखू शकला नाही. २०१९ क्रिकेट विश्वचषकापासून प्रसिद्ध झालेले एक मिम शेअर करत त्याने त्याखाली लिहिले आहे, ‘यष्ट्यांमागून मॅक्सवेलची फलंदाजी पाहताना राहुल.’

https://twitter.com/WasimJaffer14/status/1332222007673384961

किंग्ज इलेव्हन पंजाब संघानेही केले ट्विट शेअर

जाफरसोबतच पंजाबच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही मॅक्सवेलच्या खेळीविषयी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्रतिक्रियामध्ये लिहिले गेले आहे की, ‘मॅक्सवेलचा उत्तम खेळ पाहून काही कडूगोड गोष्टी आठवल्या.’

https://twitter.com/lionsdenkxip/status/1332223509179760640

बॉलीवूड फिल्म्स डायलॉग‌ असलेले मीम्स होतायेत व्हायरल

या सर्वांव्यतिरिक्त चाहत्यांनीही राहुलला ट्रोल करताना, अनेक बॉलीवूड चित्रपटांतील डायलॉग आपल्या मिम्समध्ये वापरले आहेत.

https://twitter.com/JimmyNeesh/status/1332492304410583040

https://twitter.com/MeHunBadBoy/status/1332229404232085504

https://twitter.com/DadhaniyaJit/status/1332233314220998658

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1332219587547459584

राहुल आयपीएलमध्ये पूर्णतः अपयशी ठरलेल्या आपल्या सहकाऱ्याची खेळी पाहताना काहीसा, निराश असलेले साफ दिसत होते.

महत्त्वाच्या बातम्या-

टीम इंडियाला शतकी तडाखा दिलेला फिंच आरसीबी फॅन्सकडून ट्रोल; मीम्स झाले व्हायरल

‘मला आरसीबीसाठी खेळायला मिळेल का?’, इंग्लंडच्या कर्णधाराच्या प्रश्नावर विराटने दिले ‘हे’ उत्तर

फलंदाज म्हणून हार्दिक ऐवजी ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे होती संधी, माजी भारतीय दिग्गजाचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

वनडेत सर्वाधिक वेळा ३०० हून अधिक धावा करणारे संघ, भारताच्या नावे ‘हा’ विक्रम

आयपीएलमध्ये सुपर फ्लॉप ठरलेले ३ ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताविरुद्ध पहिल्या वनडेत चमकले

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---