लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०१ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ४५वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा लखनऊकडून केएल राहुल याने कर्णधार खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत खणखणीत अर्धशतक झळकावले. यासह त्याने चालू हंगामातील आपल्या ४५० धावांचा आकडा ओलांडला आहे.
या खेळीसह आयपीएल २०२२मध्ये राहुलच्या ४५० धावा पूर्ण झाल्या आहेत. १० सामने खेळताना त्याने ५६.३७ च्या सरासरीने ४५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके आणि २ अर्धशतके निघाली आहेत. आयपीएलमध्ये राहुलने ४५० पेक्षा जास्त धावा करण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. यापूर्वीच्या ४ हंगामात राहुलने ४५० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत.
वर्ष २०२१ मध्ये त्याने संपूर्ण हंगामात १३ डाव खेळताना ६२.६०च्या सरासरीने ६२६ धावा काढल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ६ अर्धशतके निघाली होती. तत्पूर्वीच्या २०२० हंगामातही त्याने ६०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. १४ डाव खेळताना त्याने ६७० धावा केल्या होत्या. ५५.८३ च्या सरासरीने त्याने या धावा केल्या होत्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तसेच २०१९ आणि २०१८ हंगामातही त्याने धावांचा पाऊस पाडला होता. २०१९ हंगामात त्याने १४ डाव खेळताना ५९३ धावा केल्या होत्या. ५३.९१ च्या सरासरीने त्याने या धावा केल्या होत्या. तर २०१८ मध्ये १४ डावांमध्ये ५४.९२ च्या सरासरीने त्याने ६५९ धावा केल्या होत्या. यावरून राहुलच्या प्रदर्शनातील सातत्य दिसून येते. सलग पाच हंगाम ५० पेक्षा जास्त सरासरीने ४५० पेक्षा जास्त धावा करणे सोपी गोष्ट नाही.
केएल राहुलची आयपीएल कारकिर्द
तसेच राहुलच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने आतापर्यंत १०४ सामने खेळताना ३७२४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ४ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २०२० हंगामात त्याने सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅपही जिंकली होती.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये यापूर्वीही असं अनेकदा घडलंय…
पुन्हा तळपली केएल राहुलची बॅट, दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर
रोहितची विकेट पडल्यावर ढसाढसा रडली पत्नी रितिका