भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आज (२० सप्टेंबर) दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना करेल. केएल राहुल या हंगामात पहिलाच सामना जिंकून सर्वोत्कृष्ट खेळ दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याने हा हंगाम संस्मरणीय बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्याला याचा आत्मविश्वासही होता.
केएल राहुल पहिल्यांदा होणार कर्णधार
गेल्या दोन हंगामात केएल राहुलने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून उत्कृष्ट क्रिकेट खेळले होते पण यावेळी त्याच्यावर दुहेरी जबाबदारी आहे. सलामीवीर म्हणून खेळण्याव्यतिरिक्त केएल राहुल कर्णधार देखील आहे. मागच्या हंगामात संघाचा कर्णधार फिरकीपटू आर अश्विन होता. आता तो दिल्ली कॅपिटल्स संघात आहे. म्हणजेच दोन्ही खेळाडू एकमेकांविरूद्ध खेळतील. दुहेरी जबाबदारीमुळे राहुलवर थोडा दबाव असेल.
आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबची कामगिरी युएईमध्ये प्रभावी ठरली होती. या संघाने 2014 मध्ये यूएई येथे खेळल्या गेलेल्या सर्व पाचही सामन्यात विजय मिळवला होता. तथापि, प्रत्येक हंगाम वेगळा असतो. केएल राहुलने म्हटले होते की, तो त्याच्या संघाच्या समर्थकांसाठी खेळत आहे. यावेळी त्याला विश्वास आहे की तो आपल्या संघाला चॅम्पियन बनवू शकेल. आतापर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलचा खिताब जिंकलेला नाही.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघात ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी असे महान खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये कोणताही सामना आपल्या बाजूने फिरवण्याची ताकद आहे. यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाब संघ कशी कामगिरी करतो ते पाहावं लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-निवृत्त झालो म्हणून हलक्यात घेऊ नका; या खेळाडूच्या खेळीने दिला संदेश
-सामना जिंकूनही धोनी दिसला नाही समाधानी; हे आहे कारण
-सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर
ट्रेंडिंग लेख-
-२२ व्या वर्षी दिग्गजांच्या पंक्तीत सामील झालेला राशिद खान
-चेन्नईच्या ‘या’ ५ खेळाडूंनी चारली मुंबईला धूळ, ३६ वर्षीय खेळाडूने केले नेत्रदिपक प्रदर्शन
-श्रेयस अय्यर आणि केएल राहुल ‘या’ ११ खेळाडूंसह आज उतरतील मैदानावर, पहा कुणाला मिळेल जागा