भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मागील बऱ्याच महिन्यांपासून कर्णधार पदावरून मोठ्या प्रमाणात टीका सहन करावी लागत आहे. मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने मागील काही वर्षापासून सातत्याने जिंकलेली आयपीएल स्पर्धा व कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियात मिळवलेला कसोटी मालिका विजय, यामुळे विराटवर दबाव वाढत आहे. अशात आगामी काळात भारतात होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या निमित्ताने रोहितला कर्णधार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व चर्चेबद्दल भारताचा माजी यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने आपले विचार मांडले आहेत.
पार्थिव म्हणाला की, “संघ कसा बनवायचा?, हे रोहितने दाखवून दिले आहे. स्पर्धा कशा जिंकल्या जातात? हेदेखील त्याने सिद्ध केले आहे. मला वाटते की, यात काहीही चूक नाही जर रोहितला टी२० क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार बनवला गेले. याचा फायदा विराटला देखील होईल.”
पार्थिव पुढे म्हणाला, “रोहितकडे अनेक स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे. तो दबावाखाली कसे निर्णय घेतो?, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल. मुंबई इंडियन्स कधीही संतुलित संघ नव्हता. परंतु रोहितने खेळाडूंना कसे एकत्र करतात हे दाखवून दिले आणि त्याचा परिणामही दिसतो आहे.”
पार्थिवने स्पष्ट केले की टी-20 कर्णधार बनवताना रोहित आणि विराट यांच्यात तुलना करू नये. पार्थिव म्हणाला की भारताकडे आणखी एक कर्णधारपदाचा पर्याय आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. पार्थिव म्हणाला, “भारताकडे विराटशिवाय एक पर्याय म्हणून रोहित आहे. पर्याय नसल्यास, तुलना केली जात नाही. आयपीएलने दोन्ही खेळाडूंना कर्णधारपदाचे व्यासपीठ दिले असून त्यामुळे ही तुलना कायम होत राहील.”
महत्वाच्या बातम्या:
चेन्नई कसोटीत रहाणेचा ‘बदक’, सेहवाग-मुरलीला पछाडत लाजिरवाण्या विक्रमात मिळवलं अव्वलस्थानी
दक्षिण आफ्रिकेत जन्माला येतोय नवा एबी डिविलियर्स, पाहा कशी करतोय गोलंदाजांची ३६० डिग्री धुलाई
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह ‘हा’ खेळाडू होणार ‘आउट’? कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता