पुणे (17 मार्च 2024) – आजचा दुसरा सामना सांगली विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. सांगली संघ 25 गुणांसह पहिल्या क्रमांकावर तर कोल्हापूर संघ 24 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. गुणतालिकेत पहिल्या स्थानासाठी हा सामना महत्वपूर्ण होता. दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली होती. दोन्ही संघ कोणत्याही प्रकारे धोका घेत नव्हते. मध्यंतरा पूर्वी 1 मिनिटं शिल्लक असताना कोल्हापूर संघाने सांगली संघाला 15-12 अशी आघाडी घेतली होती. कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने चढाईत महत्वपूर्ण गुण मिळवले.
चुरशी झालेल्या लढतीत कोल्हापूर संघाने मध्यंतरापूर्वी 16-12 अशी आघाडी मिळवली होती. मध्यांतरा नंतरही सामना चुरशीचा झाला. कोणत्याही संघाला मोठी आघाडी मिळवता आली नाही. मध्यंतरा सांगली ने कोल्हापूर संघाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली होती मात्र जास्त वेळ आघाडी टिकवता आली नाही. शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना 25-25 असा सामना बरोबरीत होता.
कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने आक्रमक चढाया करत सुपर टेन पूर्ण करत कोल्हापूर संघाला उत्तरार्धात कोल्हापूर संघाला महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. शेवटच्या मिनिटाला कोल्हापूर संघाने सांगली संघाला ऑल आऊट करत सामना जिंकला. 35-28 असा सामना जिंकत कोल्हापूर संघाने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. सौरभ फगारे ने चढाईत 16 गुण तर वैभव राबाडे ने पकडीत 4 गुण मिळवले. तर सांगलीच्या अभिराज पवार ने अष्टपैलू खेळी करत 12 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- वैभव राबाडे, कोल्हापूर
कबड्डी का कमाल- वैभव राबाडे, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
महिला प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या संघालाही मिळणार मोठी रक्कम
पुरुष संघाशी तुलना नको! WPL फायनलआधी ‘हे’ काय बोलून गेली आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना