येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खेळाडूंचा मेगा लिलाव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये अनेक दिग्गज खेळाडू दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसून येणार आहेत. अशातच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव देखील सराव करण्यात व्यस्त आहे. लवकरच तो मैदानावर परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Kuldeep Yadav preparing himself in NCA)
भारतीय संघाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. भारतीय संघातून बाहेर झाल्यानंतर आयपीएल स्पर्धेत देखील त्याला जास्त संधी मिळाली नव्हती. येत्या काही दिवसात तो रणजी संघात खेळताना दिसून येऊ शकतो. ज्यासाठी त्याने नॅशनल क्रिकेट ॲकेडमीमध्ये सराव करण्यासाठी आणि फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी हजेरी लावली आहे. ज्याची माहिती त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
अधिक वाचा – हार्दिकचे फिरले ग्रह! संघातील स्थान गमावलेच आता सोसावे लागणार आर्थिक नुकसानही
गेली काही वर्ष त्याने आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) संघाचे प्रतिनिधित्व केले. परंतु, आगामी हंगामासाठी त्याला रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे कोणता संघ त्याला आपल्या संघात स्थान देईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, लखनऊ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांपैकी एक संघ कुलदीपला संघात स्थान देऊ शकतो. कारण त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. तसेच तो जर चांगल्या फॉर्ममध्ये असला तर अनेक दिग्गज फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो.
https://www.instagram.com/p/CXNxAa2vK11/?utm_medium=copy_link
आयपीएल स्पर्धेच्या गेल्या २ हंगामात त्याला ९ आणि ५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तसेच त्याच्या एकूण कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ४५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ८.२७ च्या इकोनॉमिने ४० गडी बाद केले आहेत. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५.८ कोटी रुपये खर्च करत आपल्या संघात स्थान देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
पुनश्च हरि ओम! चाहत्यांच्या कानात नव्याने घुमणार रवी शास्त्रींचा आवाज
व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा