---Advertisement---

ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात निराशाजनक बातमी…

---Advertisement---

मुंबई। बुधवारी(10 एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात रोमांचकारी सामना पहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाबला मुंबईने 3 विकेट्सने पराभूत करत या मोसमातील चौथा विजय मिळवला.

या पराभवाबरोबरच पंजाब समोर आणखी एक मोठी समस्या उभी राहिली आहे. पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि गोलंदाज अंकित राजपूत हे दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत. गेलला पाठीच्या दुखापतीचा त्रास होत आहे तर अंकितला बोटाची दुखापत झाली आहे. त्यामुळे आता त्यांची दुखापत किती गंभीर आहे हे, पंजाब संघाला पहावे लागणार आहे.

गेलच्या दुखापतीबद्दल बोलताना किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आर अश्विन म्हणाला, ‘गेलने सांगितले की त्याला पाठीचा त्रास होत आहे. आम्हाला तो कसा आहे हे पहावे लागेल.’

गेलने या सामन्यात केएल राहुलची साथ देताना पंजाबकडून 36 चेंडूत 63 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. यात त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. मात्र पंजाबच्या क्षेत्ररक्षणावेळी तो मैदानावर दुखापतीमुळे आला नाही.

पंजाबचे प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम गेलच्या दुखापतीबद्दल म्हणाले, ‘त्याला पाठीत ताण जाणवत आहे, असे त्याने सांगितले आहे. पुढील काही दिवस आम्हाला त्याच्यावर देखरेख ठेवावी लागेल.’

याबरोबर अंकितबद्दल अश्विन म्हणाला,  ‘अंकितला पहिल्या षटकात बोटाची दुखापत झाली आहे. मात्र तरीही त्याने पॉवरप्लेमध्ये तीन षटके गोलंदाजी केली,ही आमच्यासाठी चांगली गोष्ट होती. पण आमच्या क्षेत्ररक्षणात चढउतार येत आहेत.’

अंकितने या सामन्यात चांगली गोलंदाजी करताना शेवटच्या षटकात 31 चेंडूत 83 धावा करणाऱ्या किरॉन पोलार्डला बाद करत सामन्यात रोमांच आणला होता. मात्र शेवटच्या चेंडूवर मुंबईला 2 धावांची गरज असताना अल्झारी जोसेफने त्या विजयी धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.

या सामन्यात पंजाबकडून  केएल राहुलने आयपीएलमधील पहिली शतकी खेळी करताना 64 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यामुळे पंजाबने गेल आणि राहुलच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 197 धावा केल्या.

पण पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीमुळे मुंबईला पंजाबने दिलेले 198 धावांचे आव्हान पार करणे शक्य झाले.

महत्त्वाच्या बातम्या – 

सुरेश रैनाच्या त्या विक्रमाची बरोबरी करण्याची रोहित शर्माची संधी हुकली!

मुंबईचा राजा एकच! मुंबई इंडियन्सचे किंग्स इलेव्हन पंजाबला सोशल मीडियावर प्रतिउत्तर…

एमएस धोनीला आयपीएलमध्ये सर्वात मोठा इतिहास घडवण्याची आज सुवर्णसंधी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment