आयपीएल 2023मध्ये जोफ्रा आर्चर आपला चौथा सामना बुधवारी (3 मे) मैदानात उतरला. पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्समधील हा सामना मोहालीमध्ये खेळला गेला. पंजाबने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 214 धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सला सर्वात महागात पडला तो आर्चरच. 19व्या षटकात त्याने तब्बल 27 धावा खर्च केल्या. असे असले तरी, 16व्या षटकातील एका चेंडूसाठी त्याचे कौतुकही झाले.
मुंबई इंडियन्ससाठी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) याने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमध्ये 56 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. पंजाबच्या डावातील 19व्या षटकात आर्चर गोलंदाजीला आल्यानंतर लियाम लिविंगस्टोन स्ट्राईकवर होता. षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर लिविंगस्टोनने लागोपाठ षटकार मारले. षटकारांची हॅट्रिक करणाऱ्या लिविंगस्टोनचे कौतुक सध्या सोशल मीडियावर सर्वत्र होत आहे. आर्चरच्या कोट्यातील हे शेवटचे षटक होते.
FIFTY & going strong 🔥🔥
This has been an entertaining innings from the @PunjabKingsIPL batter 👌🏻👌🏻
Can he finish on a high note?
Follow the match ▶️ https://t.co/QDEf6eqX22 #TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/7taq5q5I67
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2023
त्याआधी आर्चरने आपेल तिसरे षटकात डावातील 16व्या षटकात टाकले. या षटकातील चौथा चेंडूत त्याने तब्बल 153 किमी ताशी गतीने टाकला. आयपीएल 2023मध्ये धावांचा पाऊस पडत आहे. मात्र वेगवान गोलंदाज तितक्या आक्रमतेने गोलंदाजी करताना दिसले नाहीत. अशात आर्चरने इतर संघांतील वेगवान गोलंदाजांपुढे एक आव्हान या सामन्यातून ठेवले. 16व्या षटकातील पहिला चेंडूत आर्चरने 120, दुसरा चेंडूत 116, तिसरा चेंडू 114 किमी ताशी गतीने टाकला. पण चौथ्या चेंडूवर त्याच्या चेंडूची गती ताशी 153 पर्यंत पोहोचली. षटकातील पाचवा आणि सहावा चेंडू आर्चरने अनुक्रमे 118 आणि 115 किमी ताशी गतीने टाकला.
153 Kph by Jofra Archer. pic.twitter.com/oyfTrRFgmq
— Johns. (@CricCrazyJohns) May 3, 2023
पंजाब किंग्जसाठी चौथ्या क्रमांकावर आलेल्या लिविंगस्टोनने 42 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82 धावा कुटल्या. तसेच जितेश शर्मा याने 27 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजी आक्रमनात पियुष चावला याने 4 षटकात 29 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. तर अर्शद खान याने 4 षटकात 48 धावा देऊन 1 विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने बिघडवला खेळ! सोपे लक्ष्य मिळूनही सीएसके विजयापासून वंचित
MI vs PBKS । नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन