कोरोना व्हायरसमुळे इतर देशांप्रमाणे भारतीय संघाचे क्रिकेटपटूही जवळपास २ महिन्यांपासून घरामध्ये बंद आहेत. आता भारतीय संघाचे काही क्रिकेटपटू काही दिवसात मैदानावर आउटडोअर सराव करताना दिसण्याची दाट शक्यता आहे.
“जर सरकारने १८ मेपासून सुरु होणाऱ्या चौथ्या लॉकडाऊनमध्ये सूट दिली तर भारतीय क्रिकेटपटू आउटडोअर सराव करण्यास सुरुवात करतील.”असे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धुमाळ (Arun Dhumal) यांनी सांगितले.
धुमाळ पुढे म्हणाले की, “या कठीण परिस्थितीत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे शक्य नाही. अशामध्ये एक पर्याय आहे की, खेळाडू आपल्या घराजवळील मैदानावर फलंदाजी किंवा गोलंदाजीचा सराव (Practice) करू शकतात. या पर्यायाबद्दल बीसीसीआय सरकारशी चर्चा करणार आहे.”
“क्रिकेटपटूंसाठी लॉकडाऊननंतर (Lockdown) रोडमॅप तयार करण्यात आला आहे. सध्यातरी ते ऍपमार्फत ट्रेनिंग घेत आहेत. ट्रेनर निक वेबने प्रत्येक खेळाडूसाठी फीटनेस कार्यक्रम तयार केला आहे. ही ऍप खेळाडूंकडे आहे. तसेच प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचाऱ्यांकडेही आहे. या ऍपमार्फत खेळाडूंना समजते की, त्यांना रोज कोणकोणता फीटनेस कार्यक्रम करायचा आहे,” असे धुमाळ पुढे म्हणाले.
“या ऍपमध्ये खेळाडूंची संपूर्ण माहिती आहे. बीसीसीआयने हेदेखील स्पष्ट केले आहे की, परिस्थिती पूर्णपणे ठीक होईपर्यंत कोणत्याही प्रकारच्या कँपचे आयोजन करण्यात येणार नाही,” असेही धुमाळ यावेळी म्हणाले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-ना विराट; ना पृथ्वी शाॅ, हाच आहे भारताचा अंडर १९चा टाॅप कर्णधार
-तब्बल ११ देशांविरुद्ध वनडेत शतकं करणारे ३ खेळाडू, एक आहे भारतीय
-पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज