आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी भारत- पाकिस्तानातील नव्हे तर जगभरातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हा हे दोन्ही संघ आमने सामने येत असतात, त्यावेळी चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. तत्पूर्वी जाणून घेऊया या सामन्याबाबत अधिक माहिती.
केव्हा खेळला जाणार भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना?
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील १६ वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना रविवारी (२४ ऑक्टोबर) रोजी पार पडणार आहे.
कुठे पार पडणार भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे.
किती वाजता सुरू होणार हा सामना?
या सामन्यातील नाणेफेक, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता होईल. तर ७:३० वाजता सामन्यातील पहिला चेंडू टाकला जाईल.
कुठे पाहु शकाल हा सामना लाईव्ह?
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा आनंद तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये घेऊ शकता. हिंदी आणि इंग्रजी सह तुम्ही हा सामना प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहू शकाल.
कुठे पाहू शकाल या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग?
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सबस्क्रिप्शन घेतले असल्यास, डिज्नी + हॉटस्टार वर पाहू शकाल. तसेच या सामन्यातील अपडेट्स तुम्ही www.mahasports.in देखील पाहू शकता.
असे आहेत दोन्ही संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार , मोहम्मद शमी
पाकिस्तान : बाबर आजम (कर्णधार ), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद, शाहीन शाह अफरीदी, शोएब मलिक
महत्त्वाच्या बातम्या-
महामुकाबल्यासाठी कशी असणार दुबईची खेळपट्टी आणि हवामान? जाणून घ्या सविस्तर
पाकिस्तानी महिला चाहलीचा राहुल-धोनीकडे सामना हरण्याचा हट्ट, मेंटॉरच्या उत्तराने केली बोलती बंद
क्या बात! केवळ चौदा चेंडूत रशीद बनला नंबर वन; नवा विश्र्वचषक विक्रम नावे






