भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केला होता. आता या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (दि. 21 जानेवारी) रायपूर येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने मोठा कीर्तिमान रचला आणि न्यूझीलंड संघाकडून लाजीरवाणी कामगिरी पाहायला मिळाली. चला तर नेमकं काय घडलं, जाणून घेऊया…
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकली. यावेळी तो काय निर्णय घ्यायचा हे विसरला होता, पण नंतर त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघ फलंदाजीला आल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा इरादा यशस्वी होऊ दिला नाही. न्यूझीलंड संघाने नियमित अंतराने झटपट विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे, पॉवरप्लेमध्ये 2 विकेट्स गमावल्यानंतर पुढील 3 विकेट्स 11व्या षटकापर्यंत गमावल्या. त्यामुळे त्यांच्या नावावर लाजीरवाणी कामगिरी नोंदवली गेली.
न्यूझीलंडच्या 5 विकेट्स
न्यूझीलंड संघाने त्यांच्या पहिल्या पाच विकेट्स या 10.3 षटकात गमावल्या होत्या. त्यांची पहिली विकेट्स फिन ऍलेनच्या रूपात 0.5 षटकात पडली. ही विकेट डावाच्या पहिल्या षटकात पाचव्या चेंडूवर मोहम्मद शमी याने घेतली होती. त्यानंतर दुसरी विकेट मोहम्मद सिराज याने 5.3 षटकात हेन्री निकोलस याच्या रूपात घेतली. तिसरी विकेट ही 6.1 षटकात शमीने डॅरिल मिचेल याची घेतली. शमीने त्याला झेलबाद केले. त्यानंतर चौथी विकेट ही डेवॉन कॉनवेच्या रूपात 9.4 षटकात पडली. ही विकेट हार्दिक पंड्या याने घेतली होती. यानंतर पाचवी विकेट ही कर्णधार टॉम लॅथम (Tom Latham) याच्या रूपात 10.3 षटकात पडली. यावेळी संघाची धावसंख्या फक्त 15 इतकी होती.
#TeamIndia are making merry & how! 👍 👍
It's raining wickets 👏 👏
Vice-captain @hardikpandya7 & @imShard have joined the wicket-taking party 🎉 🎉
New Zealand 5 down.
Follow the match ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/yTNTvdXvZZ
— BCCI (@BCCI) January 21, 2023
विशेष म्हणजे, भारतीय संघाने वनडेत न्यूझीलंडच्या रूपात विरोधी संघाच्या सर्वात कमी धावसंख्येवर 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. यापूर्वी भारतीय संघाने 2022मध्ये द ओव्हल मैदानावर इंग्लंड संघाच्या 5 फलंदाजांना 26 धावांवर गुंडाळले होते. त्याआधी 1997मध्ये भारताने कोलंबो येथे खेळताना पाकिस्तानच्या 5 फलंदाजांना 29 धावांवर तंबूत धाडले होते. भारताने 2005मध्ये हरारेच्या मैदानावर खेळताना झिम्बाब्वे संघाच्या 5 विकेट्स 30 धावांवर घेतल्या होत्या. त्याआधी कोलंबोमध्येच श्रीलंका संघाच्या 5 विकेट्स भारताने 32 धावांवर घेतल्या होत्या. तसेच, 1997मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे भारताने वेस्ट इंडिजच्या 5 फलंदाजांना 32 धावांवर रोखले होते. (Lowest total at which India had opponents 5 down)
भारताने वनडेत सर्वात कमी धावसंख्येवर विरोधी संघाच्या घेतलेल्या 5 विकेट्स
15 धावा- विरुद्ध- न्यूझीलंड (रायपूर, 2022)*
26 धावा- विरुद्ध- इंग्लंड (द ओव्हल, 2022)
29 धावा- विरुद्ध- पाकिस्तान (कोलंबो, 1997)
30 धावा- विरुद्ध- झिम्बाब्वे (हरारे, 2005)
32 धावा- विरुद्ध- श्रीलंका (कोलंबो, 1985)
32 धावा- विरुद्ध- वेस्ट इंडिज (पोर्ट ऑफ स्पेन, 1997)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IND vs NZ | रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही जिंकली नाणेफेक, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स