आयपीएलमधील नवी फ्रँचायझी लखनऊ सुपरजायंट्सचे सीईओ रघु अय्यर (Raghu Iyer) यांच्या कारचा अपघात (Raghu Iyer Car Accident) झाला आहे. लखनऊ विरुद्ध पंजाब किंग्ज (LSG vs PBKS) यांच्यातील सामन्यासाठी शुक्रवारी (२९ एप्रिल) पुण्याच्या गहुंजे स्टेडियमला जात असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला आहे. या अपघातावेळी रघु अय्यर यांच्या कारमध्ये लखनऊ संघाचे मार्गदर्शक गौतम गंभीरचा (Gautam Gambhir Manager) मॅनेजर गौरव अरोरा आणि रचिता बेरी हेही होते.
सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. सीईओ अय्यर यांच्यासह गौरव आणि रचिता हे तिघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत. लखनऊ संघाने याबद्दल माहिती दिली आहे. लखनऊ संघाकडून जाहीर वक्तव्यात असे म्हटले गेले आहे की, कारमध्ये बसलेले सर्व लोक सुरक्षित आहेत आणि पूर्णपणे बरे आहेत.
दरम्यान लखनऊ संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या रणांगणात उतरला आहे. त्यांनी आतापर्यंत शानदार प्रदर्शन करत प्लेऑफसाठी आपला दावाही ठोकला आहे. ९ सामने खेळताना ६ विजय आणि ३ पराभवांसह हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात सध्या १२ गुण आहेत.
लखनऊसाठी राहुल आणि आवेशने केलीय कमाल
लखनऊ संघाकडून कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि वेगवान गोलंदाज आवेश खान यांचे आतापर्यंतचे प्रदर्शन शानदार राहिले आहे. राहुलने आतापर्यंत आयपीएल २०२२ मध्ये २ शतके केली आहेत. तो या हंगामातील सर्वाधिक धावांच्या यादीत जोस बटलरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ९ सामने खेळताना आतापर्यंत ३७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ५३.४२ आणि स्ट्राईक रेट १४३.८४ इतका राहिला आहे.
आवेशबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने गोलंदाजीत प्रशंसनीय कामगिरी केली आहे. आतापर्यंत ८ सामने खेळताना त्याने या हंगामात ११ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २२.०९ आणि इकोनॉमी रेट ८.२८ इतकी राहिली आहे.
या दोघांव्यतिरिक्त आयुष बदोनी आणि दीपक हुड्डा यांनीही लखनऊसाठी शानदार फलंदाजी केली आहे. बदोनीने संघ संकटात असताना धैर्याने फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच हुड्डानेही मधल्या फळीत चिवट खेळी खेळत संघाचा डाव सावरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष – ‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेल्या रोहित शर्माबद्दल फारशा माहित नसलेल्या १० गोष्टी
वाढदिवस विशेष: रोहित शर्माचे ‘हे’ ५ विक्रम कोणत्याही खेळाडूला मोडणे केवळ अशक्य
खेळाडू म्हणून ६ पैकी ६ आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू