आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सची कामगिरी फारसी चांगली राहिली नव्हती. संघाने 14 पैकी 7 सामने जिंकले होते तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. संघाच्या खराब कामगिरीमुळे लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात वादही झाला होता. मैदानावर सर्वांसमोर संजीव गोयंका पराभवानंतर केएल राहुलवर चिडले होते. यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. यानंतर, केएल राहुल यापुढे पुढील हंगामापासून लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार नाही, असा अंदाज बांधला जात आहे.
केएल राहुल आणि संजीव गोयंका यांची तासभर भेट
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी लखनऊ संघ केएल राहुलला कायम ठेवणार नसल्याची चर्चा होती. मात्र, अलीकडे संजीव गोएंका आणि केएल राहुल यांच्या भेटीमुळे चित्र बदलले आहे. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्यात सुमारे तासभर बैठक झाली. या बैठकीत राहुलला लखनऊच्या संघात कायम ठेवण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय पुढील हंगामासाठी संघाचे संयोजन काय असावे, यावरही चर्चा झाली असल्याचे समजत आहे.
केएल राहुलसारखा भारतीय कर्णधार मिळणे कठीण!
जर लखनऊ सुपर जायंट्स संघाने केएल राहुलला रिलीज केले असते तर त्यांच्याकडे महान भारतीय कर्णधाराचा पर्याय उरला नसता. इतर सर्व संघ कर्णधारपदाचे उमेदवार सोडू शकत नाहीत. या कारणास्तव केएल राहुलला सोडण्यात आले तर लखनऊला तोटा सहन करावा लागला असता आणि कदाचित याच कारणामुळे त्याला कायम ठेवले जाऊ शकते. मात्र, संघातील काही मोठे खेळाडू नक्कीच बाहेर होऊ शकतात.
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सने सलग दोन हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. पण आयपीएल 2024 मध्ये संघाची कामगिरी तशी नव्हती. यावेळी मेगा लिलावादरम्यान, लखनऊ संघ अधिक चांगले खेळाडू निवडू इच्छित असेल जेणेकरून ते आयपीएल ट्रॉफी जिंकू शकतील. लखनऊ फ्रँचायझी लिलावात अनेक दिग्गज खेळाडू खरेदी करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीच्या शहरात जसप्रीत बुमराहचा जलवा! डोक्यावर मुकुट घालून महाराजासारखी एन्ट्री
भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूनं उत्तुंग षटकार ठोकत संघाला मिळवून दिला दमदार विजय!
भारतीय फिरकीपटू अश्विनसोबत फसवणूक? इंडिगो एअरलाइन्सवर ओढले ताशेरे; नेमकं प्रकरण काय