उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जपान. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमध्ये ऑलिंपिक्स २०२०च्या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पाचव्या दिवसाची (२७ जुलै) भारतीय संघाची सुरुवात पराभवाने झाली. नेमबाजीत भारतीय खेळाडू मनु भाकर आणि सौरभ चौधरी पदक फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरले. मात्र, त्यानंतर भारताने हॉकीमध्ये पुनरागमन करत स्पेनला धूळ चारली. यानंतर आता टेबल टेनिसमध्येही भारतीय खेळाडूला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
भारत आणि चीन संघात टेबल टेनिसचा तिसऱ्या राऊंडचा सामना पार पडला. यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या मा लाँगने भारताच्या शरथ कमलला ४-१ ने पराभूत केले आहे. हा सामना एकूण ४६ मिनिटे चालला. (Ma Long Beats Sharath Kamal 4-1 In 3rd Round)
#TeamIndia | #Tokyo2020 | #TableTennis
Men's Singles Round 3 ResultsSharath Kamal gave his absolute best before going down against Ma Long. An outstanding performance by the legend @sharathkamal1🙌👏 We'll be back #StrongerTogether #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/ZxlSs0DprY
— Team India (@WeAreTeamIndia) July 27, 2021
या सामन्यात मा लाँगने शरथ कमलला ११-७, ८-११, १३-११, ११-४, ११-४ अशी मात दिली. कमलला केवळ दुसरा सामना जिंकण्यात यश आले.
सोमवारी (२६ जुलै) झालेल्या सामन्यात शरथने पोर्तुगालच्या टियागो अपोलोनियाला ४-२ ने पराभूत केले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-गुड न्यूज! हॉकीमध्ये भारतीय संघाचा दुसरा विजय; स्पेनला चारली ३-० ने धूळ
-टोकियो ऑलिंपिक्समध्ये मिराबाई चानूला मिळणार ‘गोल्ड’ मेडल?