गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बीसीसीआय नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा)च्या अंतर्गत आले आहे. आता बरोबर एका वर्षानंतर भारतातील एक क्रिकेटपटू डोप पॉझिटिव्ह आढळली आहे. ही क्रिकेटपटू यावर्षी महिला वनडे लीगमध्ये खेळणारी अष्टपैलू क्रिकेटपटू अशुंला राव ही आहे. जेव्हापासून नाडाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये नमुने घ्यायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून ही पहिली क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळली आहे. Madhya Pradesh Women Cricketer Anshula Rao Fails Dope Test
नाडाने अंशुलाचा नमुना (सँपल) यावर्षी १४ मार्चला बडोदामध्ये घेतला होता. तिच्या नमुन्यात प्रतिबंधित अॅनाबॉलिक स्टिरॉइड नॉरान्ड्रोस्टेरॉन आढळले आहे. विशेष म्हणजे, अंशुलाच्या नमुन्याची चाचणी बेल्जियमच्या गेंट प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. यापुर्वीच्या चाचण्या दोहा प्रयोगशाळेत केल्या जात होत्या. पण, गेंट प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आढळलेले हे पहिलेच प्रकरण आहे. अंशुलाने आता बी नमुन्याची चाचणी करण्यास नकार दिला आहे. कारण, गेंट प्रयोगशाळेत बी नमुन्याची चाचणी करण्यासाठी खूप खर्च येत आहे.
जर अंशुला नाडा सुनावणी पॅनेल समोर स्वत:ला निर्दोष सिद्ध करु शकली नाही, तर तिच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात येऊ शकते. नाडाचे महासंचालक नवीन अगरवाल यांनी अंशुलाच्या डोप पॉझिटिव्ह आढळल्याच्या वृत्ताची पृष्टी देत म्हटले आहे की, “अंशुलावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.”
२३ वर्षीय अंशुला खूप प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज आहे. तिने यावर्षी मध्य प्रदेशच्या सीनियर संघात पदार्पण केले आणि ती वनडे लीगमध्ये तिच्या मध्य प्रदेश संघातील वेगवान गोलंदाजीची कमान सांभाळत होती. अंशुला त्या मध्य प्रदेश संघाची सदस्य आहे, जो यावर्षी महिला वनडे लीगमध्ये आपल्या ग्रुप सी मध्ये टॉपवर राहिला आहे. परंतु, कोरोना व्हायरसमुळे ही लीग पूर्ण झाली नाही. त्यादरम्यान बडोदा येथे अंशुलाचा आउट ऑफ कॉम्पटिशनल नमुना घेण्यात आला होता.
गतवर्षी बीसीसीआयने नाडाच्या संरक्षणांतर्गत आल्यानंतर त्यांना देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये नमुने घेण्याची परवानगी दिली होती. तेव्हापासून नाडा रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी या मोठ्या टूर्नामेंटबरोबर इतर छोट्या देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये खेळाडूंचे नमुने घेत आहे. पण आतापर्यंत एकही क्रिकेटपटू डोप पॉझिटिव्ह आढळला नव्हता.
डोप पॉझिटिव्ह म्हणजे काय?
खेळाडू चांगले प्रदर्शन करण्यासाठी ड्रग्स किंवा इंजेक्शन घेतात. त्यातून त्यांना एनर्जी मिळते आणि ते उत्तमोत्तम कामगिरी करु शकतात. जेव्हा अशा खेळाडूंची चाचणी होते आणि त्यांच्या युरीन किंवा ब्लडमध्ये अशा औषधांचे नमुने सापडतात. अशा खेळाडूंना डोप पॉझिटिव्ह म्हटले जाते. कोणत्याही खेळात हे चुकीचे समजले जाते.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रेंडिंग लेख –
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
कसोटी क्रिकेटमधील सर्वात धीमी खेळी करणारे ५ फलंदाज; एबी डिव्हिलियर्सचाही आहे समावेश