IPL 2024 Auction: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठी दुबईत मंगळवारी (दि. 19 डिसेंबर) मिनी लिलाव पार पडला. या लिलावात एकूण 333 खेळाडू सामील झालेले. यातील 214 खेळाडू भारतीय, तर 119 खेळाडू परदेशी होते. यातील एकूण 77 खेळाडूच खरेदी करता येणार आहेत. त्यातही परदेशी खेळाडूंची संख्या 30 एवढीच आहे. यापैकी मोजक्या खेळाडूंवर 20 कोटींपेक्षा जास्त, काही खेळाडूंवर 10 कोटींपेक्षा जास्त, तर काहींवर बेस प्राईज इतकीच बोली लागली. बेस प्राईजमध्ये विकल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये महाराष्ट्र संघाचा 18 वर्षीय स्टार फलंदाज अर्शिन कुलकर्णी याचाही समावेश होता.
अर्शिन कुलकर्णी बेस प्राईजमध्ये सोल्ड
देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) संघाकडून खेळणारा अर्शिन कुलकर्णी आयपीएल 2024 (Arshin Kulkarni IPL 2024) लिलावात 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजसह उतरला होता. त्याच्यावर बोली लावण्यासाठी संघांनी फारसा रस दाखवला नाही. मात्र, लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने अर्शिन कुलकर्णी याला त्याच्या बेस प्राईज 20 लाखांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. अशाप्रकारे आता 18 वर्षांच्या अर्शिन केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाचे प्रतिनिधित्व करेल. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळेल.
https://twitter.com/IPL/status/1737081375256121839?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1737081375256121839%7Ctwgr%5E460bf1ba7971ba5c2905a47002981323eab6d0e0%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fsports%2Fcricket%2Farshin-kulkarni-was-bought-to-lucknow-super-giants-for-rs-20-lakh-514210.html
एमपीएलमध्ये चमकलेला अर्शिन
जून 2023मध्ये महाराष्ट्र प्रीमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या एमपीएल (MPL) स्पर्धेत अर्शिनने चमकदार कामगिरी केली होती. तो ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) संघाकडून खेळताना स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू होता. अर्शिनने खेळलेल्या फक्त 3 सामन्यात 65च्या सरासरीने 195 धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे, अर्शिनने या धावा करताना एक शतकही झळकावलं होता. याव्यतिरिक्त मध्यमगती गोलंदाजी करताना त्याने 6 विकेट्सही घेतल्या होत्या. (Maharashtra Cricketer arshin kulkarni was bought to lucknow super giants for rs 20 lakh)
हेही वाचा-
IPL Auction 2024: एका ओव्हरमध्ये 5 सिक्स देणाऱ्या गोलंदाजासाठी RCB मोजले तब्बल 5 कोटी, पाहा तो कोण
धक्कादायक! ज्याने ट्रॉफी जिंकून दिली, त्यालाच केले हैदराबादने ब्लॉक; वॉर्नरने स्टोरी टाकत केला खुलासा